ॲग्लो उर्दू शाळेत हिंदीची कॉपी
By admin | Published: February 23, 2016 12:02 AM
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदीच्या पेपरला ॲग्लो उर्दू व प.न.लुंकड शाळा केंद्रांवर कॉपीचा प्रकार सुरु होता.
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदीच्या पेपरला ॲग्लो उर्दू व प.न.लुंकड शाळा केंद्रांवर कॉपीचा प्रकार सुरु होता.१२वी परीक्षेच्या हिंदी विषयाच्या परीक्षेत केंद्रांवर कॉपीचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र ॲग्लो उर्दू शाळा केंद्राच्या मागील बाजूच्या खिडक्यांचा आधार घेत काही विद्यार्थ्यांनी कॉपीच्या मदतीने पेपर सोडविला.मात्र वर्गात कॉपीचा वढता प्रकार पाहता. वर्गावरील शिक्षकांनीच खिडकीमध्ये ठेवण्यात आलेल्या कॉपी फेकून दिल्या. तर प.न. लुंकड कन्या शाळेतील काही वर्गांमध्ये कॉपीचा सर्रास वापर होत होता. तर काही वर्गांमध्ये शांतता होती. विशेष म्हणजे १२ वी परीक्षेेची शहरातील कस्टडी सेंटर याच शाळेत आहे.हिंदीचा पेपर सोपा होता. परीक्षेदरम्यान फारशा अडचणी नसल्याचे विद्यार्थ्यांनी परीक्षेनंरत सांगितले.