सुरेश गायकवाड, भाऊ कुर्हाडे प्रकरणी २० रोजी निर्णय
By admin | Published: June 15, 2015 9:29 PM
सुरेश गायकवाड, कुर्हाडे प्रकरणी
सुरेश गायकवाड, कुर्हाडे प्रकरणी २० जून रोजी निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठकऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची २० जून रोजी बैठक होत असून, यामध्ये माजी परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड आणि पाली विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ कुर्हाडे यांच्यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल मांडण्यात येणार आहे. डॉ. गायकवाड यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रकपदी असताना आपल्या मुलाचे गुण वाढविल्याची तक्रार डॉ. शंकर अंभोरे आदींनी केली होती. त्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. सोमवारी या समितीची विद्यापीठात बैठक झाली. समितीचा अहवाल २० रोजी होणार्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. पाली विभागाचे प्रमुख डॉ. कुर्हाडे यांच्या कथित गैरव्यवहारासंबंधी निवृत्त न्यायाधीश पी. के. चावरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नेमण्यात आली होती. या समितीचाही अहवाल २० रोजीच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.