शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

भारतातून युकेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये घट

By admin | Published: February 11, 2015 12:33 AM

ॲन्ड्रयू सोपेर यांची माहिती : विद्यार्थी वाढविण्यासाठी युके सरकारकडून शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

ॲन्ड्रयू सोपेर यांची माहिती : विद्यार्थी वाढविण्यासाठी युके सरकारकडून शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

पुणे : युनायटेड किंगडममधील (युके) बोगस विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून बोगस पदव्या भारतातील विद्यार्थ्यांना देण्याची प्रकरणे समोर आल्याने विद्यार्थ्यांनी युकेकडे पाठ फिरविली आहे. गेल्या ३ वर्षात भारतातून युकेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची कबुली ब्रिटीश हायकमिशनचे भारतातील उच्चायुक्त ॲन्ड्रयू सोपेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हि संख्या वाढविण्यासाठी युके सरकारने भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये घसघशीत वाढ केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी ब्रिटीश काऊन्सिलच्या पि›म भारताच्या संचालिका शेरॉन मेमीस उपस्थित होत्या. विद्यार्थी कमी होण्याचे कारण शोधून अशा बोगस विद्यापीठे, महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे, असे सांगत सोपेर म्हणाले, भारतातील विद्यार्थी वाढविण्यासाठी आम्ही ग्रेट ब्रिटन कॅम्पेनिंगची सुरूवात केली आहे. याअंतर्गत २०१५ साठी १५१ मिलियन रूपये शिष्यवृत्तीसाठी युके सरकारने दिले आहेत. ४०१ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. युकेमधील ५७ विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ११ फेब्रुवारीला ली मेरेडियनमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेरॉन मेमीस म्हणाल्या, भारतातून उच्च शिक्षणासाठी युकेमध्ये जाणार्‍यांची संख्या घटली आहे. पण पदवीसाठी युकेमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांच्या संख्येत गेल्या वर्षभरात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्यात अनेक महत्वाची विद्यापीठे आणि खूप विद्यार्थी असल्याने पुण्यातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे.