डीएड परीक्षेचा निकाल जाहीर
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे जून २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एड.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डी.एड.प्रथम वर्षाचा निकाल ३३.६० टक्के तर द्वीतीय वर्षाचा निकाल ५१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा द्वितीय वर्षाचा निकाल ४ टक्क्यांनी घटला आहे.राज्य परीक्षा परिषदेतर्फे गुरूवारी दुपारी 1 वाजता ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर निकाल जाहीर काण्यात आला.
पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे जून २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एड.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डी.एड.प्रथम वर्षाचा निकाल ३३.६० टक्के तर द्वीतीय वर्षाचा निकाल ५१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा द्वितीय वर्षाचा निकाल ४ टक्क्यांनी घटला आहे.राज्य परीक्षा परिषदेतर्फे गुरूवारी दुपारी 1 वाजता ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर निकाल जाहीर काण्यात आला.डीएड प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यातील ३३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १५ हजार २६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर ३७५ विद्यार्थांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ३२ हजार २८१ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १९ हजार ५०९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.------------