पळत्याच्या पाठीमागे लागू नका एस. एस. विटकर: मार्डी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण
By admin | Published: March 14, 2015 11:45 PM
सोलापूर: शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासूनच स्पर्धा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येत असून, पळत्याच्या पाठीमागे न लागता आपली आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहन मुख्याध्यापक एस. एस. विटकर यांनी केले.
सोलापूर: शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासूनच स्पर्धा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येत असून, पळत्याच्या पाठीमागे न लागता आपली आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहन मुख्याध्यापक एस. एस. विटकर यांनी केले.मार्डी (ता. उ. सोलापूर) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यवेक्षक सुभाष गावडे, धन्यकुमार मुडके, गंगाधर राजमाने, संतोष उमरदंड, राजशेखर म्हेत्रे, निर्मला काटे, सुनील इनामदार, चंदू शिंदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा, महात्मा फुले पुण्यतिथी सप्ताहानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील १0२ विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. संचयिकेमध्ये वर्षभरात जास्तीत जास्त रक्कम बचत केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक सुनील इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन चंदू शिंदे यांनी केले.