चार शिक्षकांना राष्ट्रीय व पाच शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार
By admin | Published: September 04, 2015 10:46 PM
नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देण्यात येणारे २०१४-१५ चे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार शासनाने जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ातील चार शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर तर पाच शिक्षकांना राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देण्यात येणारे २०१४-१५ चे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार शासनाने जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील चार शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर तर पाच शिक्षकांना राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी उमरेडच्या उंदरी येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या सहा. शिक्षिका कीर्ती मुकुंद पालटकर, हजारी पहाड मनपा शाळेच्या सहा. शिक्षिका माया सुरेश गेडाम, कामठी जि.प. उच्च प्रा. शाळेचे सहा. शिक्षक पक्षभान ढोक व मौदा तालुक्यातील जि.प. हायस्कूलचे सहा. शिक्षक सुरेशराव गुलाबराव घाटोळे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यस्तरावर भिडे गर्ल्स हायस्कूलच्या सहा. शिक्षिका डॉ. मंगला गावंडे, पारडी येथील महाराणी लक्ष्मीबाई उच्च प्रा. शाळेच्या शुभांगी दिलीप पोहरे यांना आदर्श स्त्री सावित्रीबाई फुले पुरस्कार, सीमा रवींद्र फडणवीस यांना स्काऊट गाईड पुरस्कार, माला महेंद्र चिलबुले यांना आदिवासी विभागातील कार्य करण्यासाठी व रामटेक येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे सहा. शिक्षक संघपाल तेजराम मेश्राम यांना पुरस्कार जाहीर झाले आहे.