मांद्रे कॉलेजसाठी 7 फेब्रुवारीला मोर्चा
By admin | Published: January 30, 2016 12:17 AM
पेडणे : विकास परिषद मांद्रे व मांद्रे कॉलेज अन्याय निवारण समितीतर्फे पालक, शिक्षक, विद्यार्थी व समिती यांची सभा आयोजिली होती. त्या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अँड. रमाकांत खलप, डॉ. गोविंद काळे, पत्रकार किरण ठाकूर, देवा मालवणकर, रंगनाथ कलशावकर, गावकर, प्रा. रामदास केळकर हजर होते.
पेडणे : विकास परिषद मांद्रे व मांद्रे कॉलेज अन्याय निवारण समितीतर्फे पालक, शिक्षक, विद्यार्थी व समिती यांची सभा आयोजिली होती. त्या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अँड. रमाकांत खलप, डॉ. गोविंद काळे, पत्रकार किरण ठाकूर, देवा मालवणकर, रंगनाथ कलशावकर, गावकर, प्रा. रामदास केळकर हजर होते.स्वागत व सूत्रसंचालन प्रा. रामदास केळकर यांनी केले.किरण ठाकूर म्हणाले की, शिक्षण ही चळवळ व्हायला हवी उद्याची चिंता विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी करू नये. सरकार जर शिक्षण संस्थांना मदत करीत नसेल तर मित्र मदत करतील, जनता मदत करेल.अँड. खलप यांनी आपल्या जीवात जीव असेपर्यंत हे कॉलेज चालू ठेवण्यासाठी कार्यरत राहीन. जीव विकायलाही आपण मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन केले.उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय गावात व्हावी म्हणून प्रयत्न करून मांद्रे कॉलेज उभारले. मात्र, विद्यमान सरकारने अन्याय केल्याचा दावा खलप यांनी केला. 7 फेब्रुवारी रोजी मांद्रेतील भाऊसाहेब बांदोडकर उद्यानाकडून सकाळी 9.30 वा. मोर्चाला प्रारंभ होऊन तो मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या निवासस्थानी हरमल येथे नेला जाईल, असे सांगून या मोर्चात पालक, विद्यार्थी व घरमंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन खलप यांनी केले.गोविंद काळे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)