गडकरींचा विद्यापीठातील कार्यक्रम रद्द
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM
जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.
जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. नियोजित दौर्यानुसार गडकरी सकाळी ११ वाजता जळगावी येणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला असून ते एक तास उशिराने येतील असे खडसे यांनी सांगितले. तसेच सायंकाळीही दुसर्या दिवशीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांना जळगावातून लवकर निघायचे आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील त्यांचा कार्यक्रम रद्द झाला आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. तो कार्यक्रमाही आपल्याच खात्याशी संबंधित होता. मात्र अशा अडचणीमुळे त्यांची तेथील उपस्थिती नसेल, असेही ते म्हणाले. कुणाच्याही भेटीमुळे वा तक्रारीमुळे हा कार्यक्रम रद्द झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.