नॉन-क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविली
By admin | Published: September 04, 2015 11:50 PM
दिलीप कांबळे : दोन दिवसांत अध्यादेश होणार जारी
दिलीप कांबळे : दोन दिवसांत अध्यादेश होणार जारीपुणे : नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील अध्यादेश दोन दिवसांत जारी केला जाईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नॉन-क्रिमीलेलर प्रमाणपत्राची गरज आवश्यकता असते. मात्र, या संबंधी दोन विसंगत शासन निर्णय जारी झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. महसूल विभागाकडून सहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर महसूल विभागाकडून दिले जाणारे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र महाविद्यालयांकडून स्वीकारले जात नव्हते. ही बाब पत्रकारांनी कांबळे यांच्या निदशर्नास आणून दिली. त्यावर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग सोडून इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या (नॉन-क्रिमीलेअर) प्रमाणापत्रासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाख करण्यात आली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.