मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवे
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवे
मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवेमुंबई :राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन करण्याची गरज असून त्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मराठी भाषा अभिजात असून सर्वांनी भाषेचा अभिमान बाळगायला हवा. मराठी शाळांना सक्षम करण्यासाठी शासनाने मदत करायला पाहिजे, असे मत कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.परळ येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागीय अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनात अनेक शैक्षणिक ठराव मंजूर करण्यात आले असून त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करण्यात येणार आहे. या ठरावात विना अनुदानित शाळांना तातडीने अनुदान देणे, महिला शिक्षिकांना बालसंगोपनाची राजा मंजूर करणे, शाळांचे वेतनेतर अनुदान तातडीने देणे, शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षक व शिक्षकेतरांना मेडिक्लेम योजना तातडीने लागू करणे हे ठराव मंजूर करण्यात आले.या अधिवेशनाला मुंबईतील सुमारे १२०० शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईतील ३० शाळांमधील शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेला सर्व शिक्षकांनी पाठींबा दिला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.