शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

अनुदानित शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव

By admin | Published: July 31, 2015 11:54 PM

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिकामी : शिक्षक भारती करणार आंदोलन

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिकामी : शिक्षक भारती करणार आंदोलन
नागपूर : सरकारने ५ हजार स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना मान्यता देण्याचे धोरण आखले आहे. चालू वर्षात १८०० शाळा सुरू करण्यात आल्या असून, यात मराठी माध्यमाच्या ५३ शाळा आहेत. सरकारचे हे धोरण अनुदानित शाळांना पद्धतशीरपणे बंद करण्याचे आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीने तक्रार केली आहे. याशिवाय राज्यात आरटीईनुसार ६० हजार शिक्षकांची गरज असताना १ लाख शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणा विरोधात शिक्षक भारतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्षक भारतीच्या सर्व जिल्हा कार्यकारिणीतर्फे आज शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
गेली दोन वर्षे संच मान्यता जाणीवपूर्वक सदोष ठेवून शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण केला आहे. यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन थांबविण्यात आले आहे. परिणामी नवीन शिक्षकांची भरती होऊ शकत नाही. कला, क्रीडा, कायार्नुभव या शिक्षकांची गरज असूनही ही पदे संच मान्यतेत दाखविली गेली नाहीत. यामुळे, विषय शिक्षकांची पदे कमी झाल्याचे दिसते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध ठरविण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली. मात्र, अद्याप तिचा अहवाल आलेला नाही. हजारो शिपाई, प्रयोशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपीक यांची गरज असूनही ही पदे संच मान्यतेत नाही.