हॅलो 1 : नुवे-र्शीस्थळ सरकारी शाळा बंदची हाक
By admin | Published: August 18, 2015 9:37 PM
शिक्षण विभागाचा निषेध : शाळेची पालक व नियोजन समिती आक्रमक
शिक्षण विभागाचा निषेध : शाळेची पालक व नियोजन समिती आक्रमकखोतीगाव : काणकोण तालुक्यातील नुवे-र्शीस्थळ येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आह़े याबाबत शिक्षण खात्याला माहिती देऊन खात्याने दुर्लक्ष केले आह़े त्यामुळे शाळेच्या पालक व नियोजन समितीने या जुन्या इमारतीची गुरुवारपर्यंत दुरुस्ती न केल्यास शाळा बंदची हाक दिली आह़े तसे निवेदनही शिक्षण खात्याला देण्यात आले आह़े सध्या शाळेची कौले पडू लागली आहेत़ पहिल्याच पावसात एक खांब मोडल्याने छप्पर धोकादायक स्थितीत आह़े विशेष म्हणजे अशा धोकादायक छपराखाली बसून मुले शिक्षण घेत आहेत़ इमारतीच्या भिंतीला लागूनच शौचालय आह़े दुसर्या बाजूने मुलांना खेळण्याची घसरगुंडी व झोपाळा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी होत आह़ेशाळेच्या दुरवस्थेविषयी वारंवार गावातील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत़ मात्र, या तक्रारींना संबंधित विभागाने केराची टोपली दाखविल्याचे दिसत़े त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारपासून शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आह़े (प्रतिनिधी)सध्या या संपासाठी शाळेच्या नियोजन समितीने काणकोणातील काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आह़े त्यांनी शिक्षण विभागाच्या या अनास्थेविरुद्धच्या संपामध्ये नियोजन समितीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आह़े त्यानंतर पुढील पाऊल म्हणून काणकोण बाजारात पालक मुलांना घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करत धरणे धरणार आहेत.- प्रदीप वेळीप, अध्यक्ष, नियोजन समिती-------------------------सर्व खात्यांना निवेदनेया शाळेच्या परिस्थितीविषयी गेल्या दोन महिन्यांत शिक्षण खाते, तालुका कार्यालय, जिल्हा कार्यालय आणि मुख्य संचालनालय, गोवा राज्य पायाभूत साधनसुविधा महामंडळ आणि काणकोण जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्यालाही पत्रव्यवहार करण्यात आलेला आह़े मात्र, एकाही विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही़ त्यामुळे आम्हाला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे प्रदीप वेळीप यांनी सांगितले.ढँ3 : 1708-टअफ-04कॅप्शन: सरकारी प्राथमिक विद्यालय, नुवे-र्शीस्थळ येथील छप्पर कोसळून धोकादायक झालेली जुनी इमारत. (छाया: देविदास गावकर)