शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: August 08, 2015 12:23 AM
येत्या १७ ऑगस्टला निवडणूक : भाजप व राष्ट्रवादीतून इच्छुकांची भाऊगर्दी
येत्या १७ ऑगस्टला निवडणूक : भाजप व राष्ट्रवादीतून इच्छुकांची भाऊगर्दी पुणे : शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पदाची निवडणूक १७ ऑगस्टला होणार आहे. या पदावर राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांनी दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातून इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. शिक्षक बदली प्रकरणानंतर बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदाची निवडणूक महापौर दत्तात्रय धनकवडे व शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष निरुद्दीन सोमजी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या सभागृहात होणार आहे. राष्ट्रवादीतून अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत खाबिया, वासंती काकडे, राजेंद्र काटे इच्छुक आहेत. तर भाजपकडून रघुनाथ गौडा, मंजुश्री खर्डेकर व किरण कांबळे इच्छुक आहेत. मात्र, विरोधी पक्ष असलेले भाजप, मनसे व शिवसेना एकत्र आलीतरी त्यांची सदस्यसंख्या सात होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य एकत्र आल्यास नऊ सदस्यांद्वारे आघाडीचा अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. --------------------------