शिक्षकांना जनगणनेचे मानधन द्या!
By admin | Published: August 31, 2015 9:43 PM
शिक्षक परिषदेची मागणी
शिक्षक परिषदेची मागणीफोटो - स्कॅननागपूर : केंद्र सरकारने २०१३-१४ मध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली. या जनगणनेच्या कामाला जिल्हा परिषद, महानगर पालिका व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली. शासनाचा आदेश मानून सर्व प्रगणकांनी जनगणनेचे काम वेळेत पूर्ण केले. यासाठी शिक्षकांना मानधन मिळणार होते. अद्यापही पूर्ण मानधन शिक्षकांना मिळाले नाही. शिक्षकांना जनगणनेचे १८,५०० रुपये मिळणार होते. यापैकी मानधनाचा पहिला हप्ता ८,५०० रुपये शिक्षकांना मिळाला. परंतु उर्वरित १० हजार रुपयांचा अंतिम हप्ता शिक्षकांना अजूनपर्यंत मिळाला नव्हता. शासनाच्या धोरणानुसार वारंवार मागणी केल्याशिवाय सरकारी मोबदला लवकर मिळत नाही. जनगणनेचे मानधन लवकर मिळावे म्हणून शिक्षक परिषदेने वारंवार पाठपुरावा केला. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मनपा महापौर प्रवीण दटके यांना निवेदन दिले. त्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली. जनगणनेचे मानधन येत्या १५ ते २० दिवसात शिक्षकांना मिळेल, असे अभिवचन महापौरांनी दिले. शिष्टमंडळात विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, कार्यवाह सुदाम काकपुरे, सरकार्यवाह योगेश बन, अनिल शिवणकर, लीलाधर कानोडे, सुधीर अनवाणे, दादाराव झंझाड, संजय वाटवे, राजेंद्र पटले, सुरेश तळवेकर, मनोहर जाधव, प्रदीप बिपटे, विजय चकोले, लाला बावनकर, नरेश कामडे, हरीश केवटे आदी उपस्थित होते.