-नेहा चढ्ढा
कॉलेज आता सुरु झालं. अॅडमिशनचा बहर ओसरला आणि कॉलेज रेग्युलर सुरु झालं की तो कॅम्पसचा माहौल हवाहवासा वाटू लागेल. आणि मग एकसेएक मुलंमुलं दिसू लागतील, फॅशनेबल. त्यांच्या स्टाईल्स. आणि आपल्याला कॉम्प्लेक्स. आपण दिसतो कसे? काहीजण हौशीनं नवे कपडे, नवा हेअरकट करुन घेतात. तरीही आपण स्टाईल आयकॉन नाही कॉलेजात असं वाटतंच. आणि मग अनेकांच्या डोक्यात होतो नुस्ता किचाट. वजन एक किलो जास्त असलं तरी किती ती घालमेल. किती तो धडपडाट बारीक होण्याचा. आणि जे बारीक आहे त्यांचा जाडजुड होण्याचाही.
एक बटाटावडा खायचा, एखादं वेफर्स तोंडात टाकायचं तरी मनात केवढा गिल्ट की, काय हे किती अनहेल्दी खात सुटलोय आपण.
एखादाच येतो पिंपल चेहर्यावर, एखादीच पुळी.एखादाच पांढरा केस चमकायला लागतो केसात.
जरा एक शेड सावळा होतो रंग.
कधीतरी थोडी कोरडी होते स्किन .
कधीतरी भयानकच दिसतात केस, पिंजारलेले, अजिबात सेट न होता वार्यावर उडणारे.
आणि हे सगळं असं झालं की, आपण कमालीचे अस्वस्थ होतो.
ज्याला त्याला विचारतो, काय करू? काय केलं म्हणजे वजन चटकन कमी होईल? काय केलं म्हणजे केस पांढरे व्हायचे थांबतील? काय केलं म्हणजे एकही काळं वतरुळ नाहीच येणार डोळ्याखाली, एकही सुरकुती चेहर्यावर पडणार नाही?
उत्तरं तर मिळत नाहीतच, पण मनस्ताप मात्र आपल्याला चिक्कार होतो.
आपल्याकडे काय खास आहे, हे राहतं बाजूलाच. गालावरचा एक पिंपल, वाढलेलं दोन किलो वजन तेवढं छळतं.!
कशाला एवढं जीवाला लावून घ्यायचं? सांगायचं स्वतर्ला की, इव्हन राऊण्ड इज अ शेप.
हवीये कोणाला झिरो फिगर, जमानाच गुटगुटीत असण्याच्या फॅशनचा आहे. आणि मुख्य म्हणजे फॅशन काही का असेना, आपण जे आहोत ते असे आहोत.
कितीही कमी खाल्लं तरी नाही ना होत चटकन वजन कमी, मग त्यासाठी उगाच झुरत बसायचं नाही.
कितीही क्रीम लावले तरी येतात ना चेहर्यावर एक-दोन पिंपल्स तर येतातच, जसे येतात तसे जातीलही, त्यांचे त्यांचे त्यांना काही मी फार भाव नाही देणार.
मुळात दिसण्यालाच मी फार भाव नाही देत बसणार.
म्हणजे प्रेझेटेबल असणं असतं महत्वाचं, पण सतत इतरांच्या नजरेनं स्वतर्कडं पहाण्याची सवयच मी सोडून मी देईन.
‘चालतं, एवढं काही हायपर व्हायची गरज नाही’ असं स्वतर्ला सांगितलं आणि आपण जसे दिसतो तसं कॅरी केलं की सुटते ही सवय हळूहळू.
मग कशाला लोड घ्यायचा.
मुद्दा काय, मनात आणलं तर हे दिसण्याचे, वाढत्या वजनाचे, नकोसे लोड घेण्याची सवयच एकदाची सोडून देऊ.
मस्त चिल करू.!