शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सीम कार्ड खराब झालंय? -हे कसं ओळखाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 3:38 PM

सीम अर्थात सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. हे एक पोर्टेबल मेमरी चीप असतं. या सीममुळेच आपण स्मार्टफोनवरून जगभरात कुठेही संपर्क साधू शकतो.

ठळक मुद्देअनेकवेळा असा नेटवर्क धरसोड करण्याचा प्रॉब्लेम असेल, तर हा स्मार्टफोनचा नसून सीमकार्डचा असतो.

 

-अनील भापकर

 

सीमकार्ड म्हणजे स्मार्टफोनचं हृदय. हृदय बंद पडलं सगळा खेळ खल्लास, नुस्तं शरीर बिचारं काय करणार? तेच सीमकार्डचं. स्मार्टफोन कितीही महागडा असो सीमकार्ड नसेल तर त्याचा फोन म्हणून काहीच उपयोग नाही. बिनासीमकार्ड स्मार्टफोन म्हणजे केवळ एण्टरटेनमेण्ट बॉक्स. सीम अर्थात सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. हे एक पोर्टेबल मेमरी चीप असतं. या सीममुळेच आपण स्मार्टफोनवरून जगभरात कुठेही संपर्क साधू शकतो. सीम हीच आपली एकप्रकारे ओळख असते. हे सीमकार्ड स्मार्टफोनमधून सहजगत्या काढता येतं, परत बसवता येतं. तसंच एकच सीमकार्ड हे वेगवेगळ्या मोबाइलमध्येही वापरता येतं. या एवढुशा सीमकार्डमध्ये सीम नंबर असतो, अ‍ॅड्रेसबुक असतं, नेटवर्क अ‍ॅथोरायजेशन डेटा, टेक्स्ट मॅसेज, सिक्युरिटी कि अशी बरीच अन्य माहितीही असते.

मग हे सीमकार्ड जर एवढं महत्त्वाचं असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी. ते लवकर खराब होऊ नये म्हणून जपायलाही हवं! कारण हे सीमकार्ड खराब होतं, ते खराब झालंय हेसुद्धा आपल्याला समजायला हवं.

पण कसं?

 

सीमकार्ड खराब होतं

म्हणजे काय होतं?

 

1) बरेचदा आपल्या फोनवर एक मेसेज येतो. ‘इन्सर्ट सीम’ किंवा ‘नो सीम.’ स्मार्टफोन चालू असताना किंवा नवीन स्मार्टफोनमध्ये सीम टाकलं की, बर्‍याचदा हा एरर मेसेज स्मार्टफोनवर दिसतो. अशावेळी सीमकार्ड काढून ते कुठे डॅमेज झालेलं दिसतंय का हे आधी तपासा.

2) जर सीमकार्ड व्यवस्थित दिसत असेल, क्रॅक पडलेल्या नसतील तर स्वच्छ कापडाने साफ करून परत स्मार्टफोनमध्ये टाकावं. त्याचप्रमाणे स्मार्टफोनमध्ये ज्या ठिकाणी सीमकार्ड बसते त्या ठिकाणी कॉण्टॅक्ट (सोनेरी काडय़ा) स्वच्छ कापडाने पुसता आल्या तर त्याही पुसाव्या. असं केल्यानं सीम कधीकधी सुरू होतं, पण तरीसुद्धा सीमकार्ड चालू होत नसेल, तर मात्र संबंधित मोबाइल सेवा देणार्‍या कंपनीकडून दुसरं सीमकार्ड घ्यावं.

3) अनेकवेळा स्मार्टफोन मधून-मधून नेटवर्क पकडत नाही. नेटवर्क गेलं की, आपण आधी शेजार्‍यांच्याच्या मोबाइलला नेटवर्क आहे का, ते पाहतो. जर दुसर्‍याच्या फोनला नेटवर्क असेल तर आपण आपला स्माटफोन रिस्टार्ट करतो आणि मोबाइल नेटवर्क पकडायला लागतो.

4) अनेकवेळा असा नेटवर्क धरसोड करण्याचा प्रॉब्लेम असेल, तर हा स्मार्टफोनचा नसून सीमकार्डचा असतो. मग तातडीनं सीमकार्ड बदलायला हवं.

5) एखाद्या वेळी मोबाइल पावसात भिजला किंवा पाण्यात पडला तरी बरेचदा मोबाइल नेटवर्क जातं. आपण मोबाइल स्वच्छ पुसून कोरडा करतो; मात्र सीमकार्ड कोरडे करून साफ करत नाही. अशावेळी सीम बाहेर काढून काहीवेळ हवेत ठेवावं. त्यानंतर कोरडय़ा कापडाने व्यवस्थित पुसून परत मोबाइलमध्ये टाकावं.