धनश्री संखे
कॉलेजात जायचं तर फॅशनचा हात धरावाच लागतो. त्यातही मुली. कॉलेज कॅम्पसमधल्या स्टाईल्सचा बराच विचार करतात. मात्र होतं काय कमी पैशात आपण काय करायचं, महागडी कॉस्मेटिक्स, कपडे कुठून विकत आणायची असा प्रश्न पडतो. मात्र अत्यंत कमीत कमी गोष्टी करुन आपण कॉलेजात फॅशनेबल दिसू शकतो. मुळात हेच लक्षात ठेवायला हवं की, आपण कॉलेजला जातोय, फॅशन शो ला नाही. सुंदर, प्रेझेंटेबल दिसायला हवं, मॉडेल नव्हे. त्यासाठी काय करता येईल, याच्या या काही टिप्स.
1. प्रथम मेकअप करण्या पूर्वी डीप क्लेन्सिंग करणे आवश्यक आहे ज्या मुळे आपल्या त्वचेवरील छिद्र मोकळे होतात व चेहर्यावरील मळ व तेलकटपणा साफ होतो . डीप क्लेन्सिंग करण्यासाठी डीप क्लेन्सिंग फेसवॉश किंवा क्लेन्सिंग मिल्क वापरू शकतो .
2. क्लेन्सिंग नंतर टोनिंग महत्वाच ठरत ज्याच्याने क्लेन्सिंग ने मोकळे झालेले छिद्र बुजतात व त्वचेचा पीएच लेवल बॅलेन्स होतो . सध्या बाजारात खूप प्रकारचे टोनर्स आहेत पण जर बजेट मध्ये टोनर हवा असेल तर गुलाब पाणी कॉटन ने लावण चांगला पर्याय आहे .
3. क्लेंझिंग टोनिंग नंतर तिसरी पायरी म्हणजेच मोईश्चरायझिंग. मोईश्चरायझिंग करणे गरजेचे ठरते कारण त्यामुळे मेकअप बेस चांगल्या पैकी त्वचेशी ब्लेण्ड होतो व त्वचेचा टेक्शचर सुधारतो. तुमच्या स्कीन टाइप नुसार मोईश्चरायझर निवडावा .
4. कन्सिलर हा प्रकार फक्त त्याच मुलींनी वापरावा ज्यांना डार्क सर्कल किंवा अग्ली स्पॉट्स आहेत . कन्सिलर प्रामुख्याने ब्रश किंवा रिंग फिंगर वापरुन डोळ्याच्या कडेला आतील बाजू ते बाहेरील बाजू पर्यन्त लावलं जात .
5. मिनरल फाऊंडेशन लावल्याने नैसर्गिग लुक येतो तसेच ते लिक्विड फाऊंडेशन पेक्षा कमी वेळ घेत व लवकर तयार होता येत .
6. ब्लशर चा वापर कॉलेज युवतींनी मर्यादित ठेवलेलं चांगलं . ब्लशर चा वापर हलकस चिक बोन डीफाइन करण्या पूर्ती वापरावा .
7. नॅच्युरल स्कीन कलर आय शॅडोज मिडल फिंगर ने लावता येत . त्यामधील क्रिमी आय शॅडोज निवडल्यास उत्तम .
8. ज्या मुलींच्या जाड पापण्या असेल त्यांनी पारदर्शक किंवा ब्राऊन मस्करा वापरावा व ज्यांच्या पापण्या बारीक असतील त्याने काळा मस्करा वापरावा .
9. डोळे नक्षीदार दिसण्या करिता ब्राऊन किंवा काळा आय लायनर बारीक लावावे व काजळ वापरावे.
10. लिपस्टिक ऐवजी तुम्ही डायरेक्ट टिंटेड लिप ग्लॉस पिंक, ब्राऊन किंवा पिच कलरमद्धे वापरल्यास कुठल्याही ड्रेसवर चालू शकेल व नॅच्युरल ही वाटेल .