बारावीची परीक्षा संपली आता सीईटीची तयारी सुटका : पुढील नियोजन सुरू
By admin | Published: March 10, 2016 12:26 AM
जळगाव : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून संपली असलीतरी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेची तयारीचे नियोजन विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची घरपोहोच पुस्तक योजना अयशस्वी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या पेठे हायस्कूल केंद्रातील विद्यार्थी समंत्रकांची सत्रेच न झाल्याने त्रस्त असून आता शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतली गेल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.मुक्त विद्यापीठाच्या मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विभागाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये पूर्वतयारी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी विविध ठिकाणी केंद्रे देण्यात आली आहेत. परंतु या केंद्रांवरील कारभार आता विद्यापीठाच्याच हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. पेठे हायस्कूलमधील केंद्रदेखील त्याला अपवाद ठरले नाही. या केंद्रावर गोंधळाचे वातावरण असून अनेक वर्षे संमत्रकांची संपर्कसत्रेच होत नाही. वारंवार तक्रार करून विद्यार्थ्यांना दाद दिली जात नाही. तरीही पुस्तके आणि स्वयंअध्ययनावरून विद्यार्थी कसातरी अभ्यास करतात, तर काहींना एटीकेटी दिली जात असल्याने त्याच पद्धतीने ढकलगाडी पुढे नेली जाते. यंदा मात्र विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर म्हणजे विद्यापीठाने घरपोहोच पुस्तके देण्याची योजना राबविली आणि पुस्तकांची किंमतही विद्यार्थ्यांकडून घेतली परंतु ही योजना अयशस्वी ठरली. विद्यापीठाने आपले अपयश लपविण्यासाठी विद्यार्थ्यांनी चुकीचे पत्ते दिले असा ठपका ठेवला असून आता पुस्तके हवी असल्यास पुन्हा विकत घेण्यास सांगत आहे. हा एक भाग परंतु दुसरीकडे पेठे हायस्कूलमध्ये आधीच समंत्रकांची संपर्कसत्रे होत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आले आहेत.वास्तविक, अभ्यासकेंद्राकडे कोणते पात्र संमत्रक म्हणजे शिक्षक किंवा अनुभवी व्यक्ती आहेत, त्याची यादी पडताळून आणि मान्यता देऊन मगच विद्यापीठ केंद्राला नवीन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता देत असते. त्यानंतर समंत्रकांची संपर्कसत्रे झाल्याचा विद्यार्थ्यांच्या सांच्या उपस्थितीपत्रकाच्या आधारे त्यांचे मानधनही दिले जाते. असे असताना वर्षभरात एकही संपर्कसत्र झाले नसल्यास विद्यापीठाने त्याची काय दखल घेतली हा प्रश्न आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केंद्रसंयोजकांशी वारंवार संपर्क साधून दखल न घेतल्याने अखेरीस त्यांनी विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना निवेदन दिले परंतु त्याचीही अद्याप दखल न घेतली गेल्याचे बंद असलेल्या संपर्कसत्रावरून दिसून येत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या भीतीने चिंताक्रांत आहेत.जोड आहे.