नाएसोच्या वतीने जलूदूत पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 5:18 PM
नाशिक : पाणीटंचाई ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी
नाशिक : पाणीटंचाई ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी सर्वानी सक्रिय सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मेरी शाळेत जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्र मात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय जल संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर होते. यावेळी जिल्ात जिल्हाभर पाणी बचतीचे काम करणार्या तसेच प्रसार करणार्या माजी आमदार नितीन भोसले, गोपाळ पाटील, देवांग जानी, सुनीता तारापुरे आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांना जलदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, नवनिर्वाचित नगरसेवक अरु ण पवार, प्रियांका माने, पूनम मोगरे, सरिता सोनवणे, शांताबाई हिरे, पूनम धनगर, गिते, हेमंत शेी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नितीन भोसले, गोपाळ पाटील आणि देवांग जानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. रहाळकर यांची स्काउट-गाइड संस्थेवर मुख्यालय आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आणि धुळे येथील निसर्ग संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला. प्रा. रहाळकर आणि किरण काकड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रशेखर वाड यांनी उपस्थित पाणी बचतीची शपथ दिली. सूत्रसंचालन दिलीप अहिरे व छाया गुंजाळ यांनी, तर मुग्धा काळकर यांनी आभार मानले.फोटो. (आर फोटोवर २२ सीडीओ मेरी नावाने सेव्ह आहे). सीडीओ मेरी शाळेत आयोजित जल दिन कार्यक्रमात जलबचतीची शपथ घेताना महापौर रंजना भानसी, माजी आमदार नितीन भोसले व अन्य मान्यवर.