विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांना लाभ प्रदर्शनाचा समारोप :
By admin | Published: September 05, 2015 1:37 AM
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली.
सोलापूर : सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसर्या सायन्स एक्स्पो या तीन दिवसीय प्रदर्शनाचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शुक्रवारी या प्रदर्शनाचा समारोप झाला असून, तीन दिवसांत शहर व जिल्?ातील 16 शाळांनी भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सोलापूर विज्ञान केंद्राच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना आकाशवाणीत कार्यक्रमाचे प्रसारण कसे होते, याची माहिती देण्यात आली. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल अँप, अलर्ट अँप, मोबाईल लोकेशन आदी तांत्रिक मुद्यांवर आधारित प्रदर्शन ठेवले होते. दयानंद महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या वतीने पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने लहान मुलाचे अर्भक, मेंदू, हात, पाय, फुफ्फुस आदी मानवी अवयवांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यासाठी केमिकलमध्ये ठेवलेली खरीखुरी अवयवे प्रदर्शनात होती. या प्रदर्शनात ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डाळिंब संशोधन केंद्र, रेशीम उद्योग केंद्र, सिमास अकॅडमी, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, डीएसके टोयोटा, ऑल इंडिया रेडिओ आदी विविध संस्थांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना या संस्थांच्या वतीने प्राथमिक माहिती देण्यात आली. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संग्रहालय अधीक्षक राहुल दास, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र गंभीर, गजानन सुरवसे, शरद जाधव, सुनील कुलकर्णी, सतीश मुलगे, समन्वयक मुख्तार शेख आदींनी पर्शिम घेतले. (प्रतिनिधी)चौकट..विद्यार्थ्यांना भावलेल्या गोष्टी..0 प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ‘आकाशगंगा’ पाहून आश्चर्य वाटले. अंतराळात असलेली स्थिती पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. 0 टेक्स्टाईलशी संबंधित सर्व माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. 0 ऑडिटोरिम हॉलमध्ये विद्यार्थ्यांंना ‘3-डी’ चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट पाहून मुले आनंदित झाली़0 बागेत मुले मनसोक्त बागडत होते, विज्ञानावर आधारित विविध खेळांचा आनंद लुटत होते. कोट..विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनातून विद्यार्थ्यांंमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन भविष्यात एखादा शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतो. विज्ञान काळाची गरज असून, विद्यार्थ्यांंमध्ये रूजले पाहिजे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. राहुल दास, संग्रहालय अधीक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र, केगाव.