५१७ पैकी ३१० शाळाबा विद्यार्थ्यांचे झाले प्रवेश शिक्षण : स्वयंसेवकांनी सर्वेक्षणात करून ठेवला घोळ
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
जळगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये; म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात सर्वेक्षणात जिल्ातील ५१७ मुले शाळाबा आढळून आली होती. पैकी ३१० विद्यार्थ्यांचाच प्रवेश आतापर्यंत झाला आहे.
जळगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये; म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात सर्वेक्षणात जिल्ातील ५१७ मुले शाळाबा आढळून आली होती. पैकी ३१० विद्यार्थ्यांचाच प्रवेश आतापर्यंत झाला आहे. गेल्या वर्षीदेखील शाळाबा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, सर्वेक्षणात आढळून आलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचा प्रवेशच झालेला नव्हता. त्यानुसार यंदा शिक्षण विभागातर्फे शाळाबा आढळून आलेला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ातील सर्व गटशिक्षणाधिकार्यांना त्यांच्या प्रवेशाबाबत सूचित करण्यात आले होते. सर्वेक्षणात घोळ हे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणार्या जे विद्यार्थी शाळाबा नाहीत, त्या विद्यार्थ्यांची नावेही सर्वेक्षणात घेतले आहे. त्यानुसार अहवालानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना शाळाबा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अडचणीचे ठरत आहे. मार्च अखेर चालणार प्रवेश प्रक्रिया शाळाबा विद्यार्थ्यांना मार्चच्या अखेरपर्यंत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत पालक शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांना २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाने काहीही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रवेशासाठी जे पाल्य पात्र ठरत आहे. त्या विद्यार्थ्यांचे पालक चौकशीसाठी शहरातील शाळांमध्ये धाव घेत आहेत.