नव्याने उत्तीर्ण झालेल्यांना पॉलिटेक्निक प्रवेश
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेश दिले जातील,असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेश दिले जातील,असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)स्पष्ट करण्यात आले आहे.यंदा प्रथमच मार्च 2015 च्या दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये दहवीची फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.परंतु,या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी मिळयला हवी,या उद्देशाने डीटीईने सर्व विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या कायम विनाअनुदानित, खासगी संस्थांस्तरावरील रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत,असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी जाहीर केले आहे.