पॉलिटेक्निक दीक्षांत समारंभ
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्या
तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्यासंजय चहांदे : शासकीय तंत्रनिकेतनचा दीक्षांत समारंभ थाटात(फोटो आहे- रॅपमध्ये)नागपूर : देशाचा विकास करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ शासनावर विसंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने त्याकरिता प्रयत्नरत असायला हवे. विशेषत: जागतिकीकरणाच्या या युगात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काम करीत असले तरी तरुणांनी राष्ट्रविकासाचा नेहमीच विचार करायला हवा, असे मत राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले. स्थापनेची शंभर वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १७ वा दीक्षांत सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला महासत्ता करण्यासाठी तांत्रिक संशोधनावर भर देण्याची गरज आहे. तांत्रिक शोध थांबला तर देशाच्या विकासाची गती थांबेल. तंत्रज्ञानात प्रगती करण्याची फार मोठी जबाबदारी ही शासकीय तंत्रनिकेतनची आहे, असे चहांदे म्हणाले. गुलाबराव ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाला दर्जेदार करण्यासंबंधीच्या मुद्यांवर भर दिला. डॉक्टर व इंजिनीअर हे देशाचे आधारस्तंभ आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण पद्धतीत गुणात्मक बदल करणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या कार्याकडे जोमाने लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. थोरात यांनी शैक्षणिक अहवाल वाचनातून शंभर वर्षांच्या उज्ज्वल यशाची माहिती दिली. संचालन दिशा खंडारे यांनी केले तर प्रा. आर.ई. गजभिये यांनी आभार मानले. ७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान१७ व्या दीक्षांत समांरभात ७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. यंदा स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील वैभव राजेश्वर घुशे या विद्यार्थ्याने सर्वाधिक सहा सुवर्णपदके पटकावली. हिमांशू संजय करडभाजणे (अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी), कृतिका उमाजी पांडे (वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान), दीपक केशवराव सोनवणे (स्वयंचल अभियांत्रिकी) यांचा प्रत्येकी तीन सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात आला.