कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेची माहिती भरण्यास प्राचार्यांचे र्दुलक्ष
By admin | Published: June 12, 2015 1:52 AM
अकोला : कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीची संच मान्यता यावर्षीपासून ऑनलाइन करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य संच मान्यतेची माहिती भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवणे यांनी दिला.
अकोला : कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीची संच मान्यता यावर्षीपासून ऑनलाइन करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य संच मान्यतेची माहिती भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवणे यांनी दिला. सन २0१४-१५ पासून अकरावी व बारावीची संच मान्यता ऑनलाइन करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यांकडून महाविद्यालयाची संच मान्यतेची माहिती ऑनलाइन भरण्याचे काम सुरू आहे; परंतु काही प्राचार्य संच मान्यतेची माहिती भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर काहींनी अपूर्ण व चुकीची माहिती भरली असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनी दुरुस्तीसह पूर्ण माहिती भरून द्यावी. कनिष्ठ महाविद्यालयांनी चुकीची व अपूर्ण माहिती भरल्याने, त्यांची संच मान्यतेची माहिती परत पाठविण्यात आली आहे. प्राचार्यांनी सविस्तर व अचूक माहिती ऑनलाइनवर पाठवावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक सोनवणे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला. अडचण असल्यास प्राचार्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी कळविले. (प्रतिनिधी) 0000000000000000000000