विविध शाळांचे निकाल
By admin | Published: June 15, 2015 9:29 PM
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून दोन विद्यार्थ्यांनी सस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.विपुल चव्हाण याने 95.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. साकेत वारघडे याने 95.20 गुण मिळवून द्वितीय तर शुमन वाघ याने 94 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. अद्वैत जोशी याने शाळेत चौथा क्रमाक पटकावला असून त्याला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.सुधांशु जेना यांचा पाचवा क्रमांक आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून दोन विद्यार्थ्यांनी सस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.विपुल चव्हाण याने 95.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. साकेत वारघडे याने 95.20 गुण मिळवून द्वितीय तर शुमन वाघ याने 94 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. अद्वैत जोशी याने शाळेत चौथा क्रमाक पटकावला असून त्याला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.सुधांशु जेना यांचा पाचवा क्रमांक आहे.----------------------------न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेचा दहावीचा निकाल 96.60 लागला आहे. शाळेतील 418 विद्यार्थ्यांपैकी 402 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 160 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 135 विद्यार्थी 135 प्रथम श्रेणीत तर 92 विद्यार्थी द्वितीय आणि 20 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.शाळेत अर्थव कुलकर्णी याने 96.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून शार्दूल कुलकर्णी व सार्थक शहा याने 96 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि केतन कुलकर्णी याने 94.07 टक्के गुण मिळवत तृत्तीय क्रमांक मिळविला आहे.--------------------------------- अहिल्यादेवी हायस्कूलचा दहावीचा निकाल 99.45 टक्के लागला शिवांगी बोडस याने 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तसेच प्राजक्ता पवार हिने 97.20 टक्के आणि निवेदिता घोडके हिने 96.60 टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.शाळेतील 365 विद्यार्थीनींपैकी 363 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शिवानी वैद्य,अदिती घाटपांडे आणि तनया पंडीतराव यांच्यासह शाळेतील 57 विद्यार्थीनींनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. शाळेतील 15 विद्यार्थीनींनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.-----------------------------टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून अदित्य देवधर याने 96.00 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.अनुज जगताप याने 95.60 आणि जान्हवी पुरोहित हिने 95.40 टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. सुधांशु अग्निहोत्री,इशा जोशी,हर्ष जोशी,सिध्दी जोशी यांच्यासह 60 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.संस्कृत विषयात 12 विद्यार्थ्यांनी 100 आणि मानसी फुटे हिने गणित विषयात 100 गुण मिळविले.