१ मेपर्यंत परीक्षा शुल्क परत करा विद्यापीठाचे आदेश : अन्यथा महाविद्यालयावर कडक कारवाई होणार
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM
जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. महाविद्यालयाने जर अशा विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले असेल तर ते शुल्क १ मे २०१६ पर्यंत संबंधित विद्यार्थ्यास परत करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. महाविद्यालयाने केलेला कार्यवाहीचा लेखी अहवाल विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडे १० मे २०१६ पर्यंत विनाविलंब पाठविण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. ज्या महाविद्यालयामार्फत पात्र विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्क घेण्यात आल्याची तक्रार आली तर अशा महाविद्यालयावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी सांगितले.