रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे; तर हत्या जोगेंद्र कवाडे यांचा संवाद : द्रोणाचारी प्रवृत्ती असेल तर आणखी असे बलिदान होतील
By admin | Published: February 07, 2016 10:45 PM
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला.
जळगाव : हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नसून त्याची दबावापोटी हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी विद्यापीठात आयोजित समता विद्यार्थी प्रबोधन संमेलानात एका विद्यार्थ्याने त्यांना जाहीर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केला. संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रश्नउत्तराचा तास सुरू झाला. तेव्हा एका विद्यार्थ्यांने रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या झाली, तरी दोषींना शासन झालेले नाही? असा सवाल त्यांना विचारला. तेव्हा प्रा. कवाडे म्हणाले, की आत्महत्या झाल्यानंतर प्रसारमाध्यमातून जे वृत्त प्रसारीत झाले. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी त्याची जात विचारली होती. रोहित हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे रोहितसह त्याच्या चार सहकार्यांची चार महिन्यांपासून शिष्यवृत्ती विद्यापीठाने पाठपुरावा करूनही दिली नाही. अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही जो दबाव त्याच्यावर टाकला. त्यामुळे रोहितने आत्महत्या केली. समाजातील द्रोणाचारी प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही. तोपर्यंत अशा अनेक रोहितला बलिदान द्यावे लागेल, असे प्रा. कवाडे यांनी म्हटले. ...तर त्या देवावर बहिष्कार टाकासंमेलनात शीतल चौधरी या विद्यार्थिनीने प्रा. कवाडे यांना शनी शिंगणापूर येथे महिलांसाठी दर्शनाचा मुद्दा उपस्थित केला. ती म्हणाली, समाजात स्त्री-पुरुष समानता दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. कवाडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शनी देव तुमच्या पाठीमागे फिरत होता. आता तुम्ही शनी देवाच्या पाठीमागे फिरत आहेत. कुठल्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असेल तर तुम्ही त्या देवावरही बहिष्कार टाका. त्याचा विचारही करू नका. जे पुरुष आणि महिला असा भेदभाव करतात. ते संविधानाचे द्रोही आहेत. त्याही पुढे जाऊन ते लोक देशद्रोही आहेत. प्रस्तापित व्यवस्था तरुणांनी गाडून टाका प्रा. कवाडे म्हणाले, की पुरोगामी चळवळीतील लोकांनी संत, महंत यांना जाती व्यवस्थेत राहणार्या लोकांनी वाटून घेतले आहे. त्यामुळे प्रस्तापित समाज व्यवस्थेतील ही विचारसरणी तरुणांनी गाडून टाकावी, असे आवाहन त्यांनी केले.