सरसंघचालकांना विद्यार्थिनींनी बांधली राखी
By admin | Published: August 31, 2015 12:24 AM
नागपूर : वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित वसुंधरा मुलींच्या वसतिगृहात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या.
नागपूर : वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित वसुंधरा मुलींच्या वसतिगृहात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना वसतिगृहातील विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. विदर्भातून २५ मुली तर अरुणाचल प्रदेशातील १३ मुली वसुंधरा वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिनींसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या मीना पाटील यांनी सर्वप्रथम मोहन भागवत यांना राखी बांधून आशीर्वाद घेतला, त्यांनतर वसतिगृहातील मुलींनीही राखी बांधून त्यांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी संस्थेचे नागेश पाटील यांनी संस्थेची संपूर्ण माहिती दिली. सृष्टी राऊत हिने पंतप्रधानांसमोर सादर केलेली कविता यावेळी सादर केली. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थिनींना भरपूर अभ्यास करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मुलींना महापुरुषांच्या जीवनावर आधारीत पुस्तकांचा संच भेट दिला. या कार्यक्रमाला संस्थेचे रवींद्र बोखारे व इतर मान्यावर उपस्थित होते.