तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By admin | Published: March 22, 2016 12:41 AM
हॅलो १ साठी...
हॅलो १ साठी...जळगाव- सर्वोदय स्कॉलरशिप परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठानमधील ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयातील वैभव झोपे, प्रज्ज्वल पाटील व अनुजा मंजूळ यांनी यश मिळविले आहे. त्यांना तुषार नाईक व शुभांगी नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे ज्ञानेश्वर पाटील, अंजली महाजन, जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. बाजार समितीची आज सभाजळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीची २२ रोजी सकाळी ११ वाजता मासिक सभा होणार आहे. त्यात कमी दरात केळी खरेदी, गाळे व इतर मुद्द्यांवर चर्चा होईल. सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी व संचालक उपस्थित राहतील. उपमहापौरांचा सत्कारजळगाव- उपमहापौर ललित कोल्हे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. गोविंदा ठाकरे, एस.वाय.पाटील, राजू ठाकरे, अजय साळवे, अरुण श्रीखंडे, सुरेश पाटील, घनाभाऊ ठाकरे, अशोक ठाकरे, सुनील पाटील, सागर सोनवणे, अण्णा नन्नवरे, सुभाष नन्नवरे, युवराज बाविस्कर, दिलीप रायसिंग, सुरेश अहिरे, अर्जुन कोळी, शांताराम पाटील आदी उपस्थित होते. तापमानवाढीवर व्याख्यानजळगाव- माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळाच्या अभिनव विद्यालयात तापमान वाढ समस्या व उपाय या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पुष्पा भंडारी, प्रवीण सोनवणे, महेश गोरडे, प्रा.एस.व्ही.सोमवंशी, सोमनाथ महाजन हे उपस्थित होते. राज ठाकरे, गंधर्व पाटील, हितेंद्र वाल्हे, प्रसाद रसाळ, गायत्री माळी, हर्षदा शिंदे आदींनी स्पर्धेत सहभाग घेतला. अश्विनी काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. गुरू बारेला यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी ज्योती शिंदे, नीता पाटील, संतोष सपकाळे, अनिल जोशी आदींनी सहकार्य केले. गाढोदे येथे कीर्तन सप्ताहगाढोदे- विठ्ठल मंदिरात कीर्तन सप्ताह झाला. सकाळी काकड आरती, भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ असे कार्यक्र्रम झाले. गजानन महाराज, अरूण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, माधव महाराज, जनार्दन महाराज यांचे कीर्तन झाले. किशोर महाराज मृदंगाचार्य व रोहिदास महाराज गायनाचार्य होते. पंचक्रोशीतील भजनी मंडळाने सहकार्य केले. ४९ वर्षांपासून हा कार्यक्रम होत आहे. शेतकरी पांडुरंग पाटील यांनी मंदिरास सात पंखे दिले आहेत. (वार्ताहर)