शाळा महाविद्यालय.....
By admin | Published: February 20, 2015 1:10 AM
भोसले महाविद्यालय, कुही
भोसले महाविद्यालय, कुहीकुही : स्थानिक राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी घनश्याम धवड होते. यावेळी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम धोटे, एच. जी. नागमोते, डी. डी. जेठे, माजी सरपंच मंगरुजी फेडर, गणेश येळणे आदी उपस्थित होते. प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयवंत जगताप यांनी केले. यावेळी स्थानिक पत्रकार सुधीर भगत, भालचंद्र गांगलवार, देवीदास देशमुख, शरद मेश्राम, शोभा गांगलवार आदींचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. गजानन मांडेकर यांनी तर आभार डॉ. प्रवीण लामखाडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी).....जनता विद्यालय, मौदामौदा : स्थानिक जनता विद्यालयात सरस्वती पूजन कार्यक्रम पार पडला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेत स्वच्छता मोहीम राबवून आकर्षक सजावट केली होती. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक युवराज बेहरे होते. यावेळी उपप्राचार्य साहेबराव कांदे, संजय डोमेवाले, प्रकाश साखरे, प्रकाश कोरडे, तीर्थमाला गजभिये, विनोद कनोजे आदी उपस्थित होते. प्रसंगी सरस्वती माता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक एकनाथ कापगते यांनी केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर नृत्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संचालन अमिषा भोयर हिने तर आभार आरती मेश्राम हिने मानले. कार्यक्रमास सुरेश वैरागडे, शरद आमदरे, सचिन मोरया, दिलीप इंगोले, पराग लिमजे, पायल भागलकर, रवींद्र फोपसे, विजया डोमेवाले, गणेश रावते, सचिन कन्नाके आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)....रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट, कोदामेंढी कोदामेंढी : स्थानिक राजेश्वरी रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. संस्थेचे संस्थापक सत्यनारायण रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य शकुंतला हटवार, प्राचार्य सरस्वती राय, सोमकुवर, बिसने, विनिता रेड्डी यांची उपस्थिती होती. शाळेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल मान्यवरांनी प्रशंसा केली. कार्यक्रमास पोलीस पाटील प्रकाश देवतळे, नूतन डेकाटे व बहुसंख्य पालक उपस्थित होते. (वार्ताहर)