शाळा महाविद्यालय
By admin | Published: August 10, 2015 11:28 PM
आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल
आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूलनागपूर : धरमपेठ शिक्षण संस्थेच्या समर्थनगर येथील आर.एस. मुंडले शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा जोपासत याहीवर्षी १०० टक्के निकाल देत घवघवीत यश मिळविले आहे. शालांत परिक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस.बी. जैन इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंटचे विभागप्रमुख सुमत टेकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयात प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा, एमटीएस, गणित प्रज्ञा परिक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे दत्ताजी टेकाडे, सहसचिव मेधा नांदेडकर, सदस्य विनोद जोशी, शाळा समिती अध्यक्ष रत्नाकर केकतपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चांगदे यांनी शाळेचा २०१४-१५ चा अहवाल सादर केला. पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय महाराष्ट्र राज्य पाली प्राध्यापक परिषद व आवाज इंडिया टीव्हीच्या संयुक्त विद्यमाने पी.डब्ल्यू.एस. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सिध्दार्थ सभागृहात धम्मपद पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्रमण संस्कृति प्रज्ञ प्रा. भागचंद्र जैन, डॉ. बालचंद्र खांडेकर, प्राचार्य डॉ. आर. पी. गान, अमन कांबळे, डॉ. मालती साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसिध्द कवि इ. मो. नारनवरे आणि डॉ. आशा आंभोरे, धम्मपद स्पर्धेचे परिक्षक म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत एस.सी.एस. गर्ल्स कॉलेजची वैष्णवी इनकने हीने प्रथम पारितोषिक मिळविले. जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या हर्षला बमनोटे व तन्वी महाजन यांना द्वितीय आणि तृतिय पुरस्कार मिळाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निलीमा चौव्हाण तर आभाार प्रदर्शन प्रा. प्रणोती सहारे यांनी केले.भवन्स विद्यामंदिरनागपूर : श्रीकृष्णनगर येथील भवन्स बी.पी. विद्या मंदिर शाळेत हिंदी विभागातर्फे हिंदी विषय प्रदर्शनी साहित्य संगमचे डॉ. योगेश्वरी शास्त्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हिंदी साहित्यातील सर्व शाखांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आणि त्यांच्यात हिंदी साहित्याची अभिा्रुची वाढविण्याच्या उद्देशाने प्रदर्शनी भरविण्यात आली. यामध्ये साहित्य प्रकारातील कहाणी, निबंध, संस्मरण, फिल्म आलेख, डायरीलेखन, यात्रा विवरण, पटकथा लेखन, रेडिओ नाटक, रुपक आदी प्रकार भित्तीपत्रक आणि नाट्यप्रस्तुतीद्वारे विद्यार्थ्यांना समजाविण्यात आले. भारतीय विद्या भवन केंद्राच्या सचिव सुनंदा सोनारीकर, केंद्राचे सदस्य क्यू.एच. जीवाजी, डॉ. राजेंद्र चांडक, पालक प्रतिनिधी डॉ. प्रवीण लाड, प्राचार्या अन्नपुर्णा शास्त्री, उपप्राचार्या निरुपमा अय्यर आदी उपस्थित होते.