- वन-पर्यटन व पर्यावरणद्वारे स्वयंरोजगाराची सुसंधी
By admin | Published: February 01, 2016 12:03 AM
युथ एम्पॉवरमेंट समीट
युथ एम्पॉवरमेंट समीट ---------------------- वन-पर्यटन व पर्यावरणद्वारे स्वयंरोजगाराची सुसंधीपर्यावरण संरक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. यामध्ये एन्व्हायरमेंट लीगल कन्सल्टटंट म्हणून काम करता येते. तसेच स्वत:ची संस्था सुरू करूनही पर्यावरण संरक्षणासाठी खूप काही करता येत असल्याचे प्रतिपादन ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी सांगितले. वन-पर्यटन व पर्यावरणद्वारे स्वयंरोजगाराची सुसंधी विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी डिफेन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर लेफ्टनंट कर्नल दिलावर सिंह यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन उत्पादनाद्वारे उद्योगांना प्रोत्साहन देता येत असल्यावर माहिती दिली.- कौशल्य विकास काळाची गरज - जयश्री फडणवीसआपली शक्ती, आपल्यासाठी उपलब्ध संधी, आपल्या योजनेतील धोका आणि आपल्यातील कमीपणा या सर्वांचे अध्ययन करून तरुणांनी आपल्या कलागुणांचा उपयोग करणे आणि कौशल्य विकास करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. आपले व्यक्तिमत्त्व पॉलिश करून मॅनेजमेंट गुणांचा विकास करावा. तसेच काम करीत असलेल्या ठिकाणी आपले बोलणे-वागणे हे प्रोफेशनल असावे, अशा महत्त्वपूर्ण टिप्स डॉ. जयश्री फडणवीस यांनी तरुणांना दिल्या. उद्योग व्यवसायाकरिता आवश्यक व्यक्तिमत्त्व विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. - नागपूर उद्योजकांचे माहेरघर - देवेंद्र पारेखराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूरने अनेक उद्योजक दिले आहे. त्यामुळे नागपूरला उद्योजकांचे माहेरघर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दिनशा, हल्दीराम, विको अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे तरुणांनी उद्योग उभारण्याची संधी शोधावी आणी स्वत:चा विकास करावा, असे देवेंद्र पारेख यांनी सांगितले.