सिंगल बातम्या
By admin | Published: December 08, 2015 1:51 AM
राजेभाई उर्दू स्कूलमध्ये आनंद मेळावा
राजेभाई उर्दू स्कूलमध्ये आनंद मेळावा सोलापूर : गेंट्याल चौकातील राजेभाई उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला़ फैज इनामदार यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाल़े विद्यार्थ्यांनी स्टॉल थाटले होत़े उपस्थितांनी स्टॉलला भेट दिली़ यावेळी मुख्याध्यापक एस़ एम़ पिरजादे, तसनीम आय. शेख, बागवान, हिप्परगी, औसेकर आदी उपस्थित होत़े यशवंतराव होळकर यांना अभिवादन सोलापूर : उत्तर सदर बझार परिसरात कामाठीपुरामध्ये धनगर आरक्षण सेनेच्या वतीने राजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आल़े अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल़े यावेळी उत्तमभैय्या नवघरे, अर्जुन सलगर, बापू बंडगर, दीपक बंडगर उपस्थित होत़ेकुचन प्रशालेचे कथामालेच्या स्पर्धेत यश सोलापूर : जिल्हा साने गुरुजी कथामालेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवल़े महेंद्र र्शीपुरम याने सामान्यज्ञान स्पर्धेत दहा हजारांचे पारितोषिक पटकावले तर सिद्धेश्वर कोळी आणि पल्लवी ननवरे यांना उपक्रमशील शिक्षकांचा मान मिळाला़ प्राचार्य डॉ़ मीरा शेंडगे यांनी कौतुक केल़े मुल्लाबाबा यांचा गुरुवारी उरूस सोलापूर : थोर सुफीसंत हजरत गौस मोहियोद्दीन मुल्लाबाबा यांचा 67 वा उरूस 10 डिसेंबर रोजी होत आह़े गुरुवारी संदल मिरवणूक, शुक्रवारी झेल्याची मिरवणूक काढली जाणार आह़े शनिवारी सकाळी जियारत फातेहा होणार आह़े शुक्रवारी रात्री 7 वाजता उत्तर कसब्यातील थोरला मंगळवेढा तालीम येथून झेल्याची मिरवणूक निघणार आह़े विनयभंग प्रकरणात आरोपीला जामीन सोलापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपात राहुल उर्फ भैय्या निकंबे याला जिल्हा न्यायाधीश जाधव यांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला़ याबाबत सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला़ सरकार पक्षाच्या वतीने अँड़ प्रवीण शेंडे तर आरोपीच्या वतीने अँड. संजय गायकवाड यांनी काम पाहिल़े 20 रोजी सर्वधर्मीय वधू-वर मेळावा सोलापूर : मातोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि अ़ भा़ महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने 20 डिसेंबर रोजी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या वैकुंठभाई सभागृहात राज्यस्तरीय सर्वधर्मीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आह़े 8 डिसेंबरपासून गोंधळे वस्ती येथील कार्यालयात नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आह़े दमाणी प्रशालेत विद्यार्थी-शिक्षक दिन साजरासोलापूर : बुधवार पेठेतील बी़ एफ़ दमाणी प्रशालेत विद्यार्थी-शिक्षक दिन साजरा करण्यात आला़ या दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय वेळपत्रकानुसार कामकाजाची धुरा सांभाळली़ प्रसाद गुंगे यांनी मुख्याध्यापकपदाचा भार सांभाळला़ शिक्षकांच्या वतीने हणमंत जमादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल़े यावेळी मुख्याध्यापिका स्नेहल सोनटक्के, ज्योत्स्ना मळेकर उपस्थित होत़े