सिंगल बातम्या
By admin | Published: February 20, 2016 2:01 AM
वृत्तपत्र मंचच्या स्पर्धेचा निकाल जाहीर
वृत्तपत्र मंचच्या स्पर्धेचा निकाल जाहीर सोलापूर : जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत अंजली व्हनमाने (सहस्त्रार्जुन प्रशाला), मेघा र्शीशैल जोजन (गजानन महाराज विद्यामंदिर) या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला़ या परीक्षेत द्वितीय - वैष्णवी कांबळे (पवार प्रशाला ), तृतीय - सौरभ भोसले (दमाणी प्रशाला) यांनी प्रावीण्य मिळवल़े अशोक म्हमाणे आणि सुनील पुजारी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिल़ेशिवजयंतीनिमित्त एस़टी़कामगारांचे रक्तदान सोलापूर : शिवजयंतीनिमित्त एस़टी़कामगार शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर राबवण्यात आल़े आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाल़े या शिबिरात 50 जणांनी रक्तदान केल़े यावेळी स्थानकप्रमुख एस़एम़कदम, वाहतूक निरीक्षक पी़ एस़ हानगल, प्रकाश अवस्थी, बाळासाहेब मोरे, शहाजी घोडके, आय़ पी़ कोळी, रवी राठोड, डी़ के. सुरवसे, सुनील भोसले, ताराचंद राठोड उपस्थित होत़े न्यू बसवेश्वर शिक्षण संकुलात पालक मेळावासोलापूर : न्यू बसवेश्वर मराठी विद्यालय आणि मातोर्शी लक्ष्मीबाई हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक मेळावा पार पडला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक समितीचे उपाध्यक्ष कंकरसिंग टांक होत़े प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दीपक जवळकोटे, दीपक चिकलंडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तानाजी माने, शहाजी ठोंबरे, माधुरी लडाख, संतोष दरीगोळ, वर्षा हुंबे, बिराजदार उपस्थित होत़े यावेळी स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादित विद्यार्थ्यांचा गौरव झाला़ शिवप्रभू प्रशालेत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सोलापूर :अकोलेकाटी येथील शिवप्रभू माध्यमिक प्रशालेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला़ तसेच स्व़ अलकाताई बरडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली़ याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश जगताप, प्राचार्य शंकर वडणे, डॉ़ प्रीती र्शीराम, महादेव गोटे, लक्ष्मीकांत वेदपाठक यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती़ याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आल़े यावेळी वक्त्यांनी मार्गदर्शन केल़े अमर मराठी विद्यालयाचे स्नेहसंमेलन थाटात सोलापूर : उत्तर सदर बझार येथील अमर मराठी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक समितीच्या सदस्या यास्मिन इनामदार होत्या़ अरुणा बोंडगे, वंदना अंबरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या़ पालक समितीच्या रेखा देशमुख आणि सुनीता दळवी यांनी मनोगत व्यक्त केल़े मुख्याध्यापक येलम यांनी प्रास्ताविकेतून आढावा घेतला़ यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुण दर्शनाचा कार्यक्रम झाला़ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली़ न्यू इंग्लिश स्कूलचे गणित, आयसीटीचे प्रदर्शनसोलापूर : सोशल असोसिएशन संचलित एस़ एस़ ए़ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने भरवण्यात आलेल्या गणित आणि माहिती तंत्रज्ञान विषयाच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला़ या प्रदर्शनात चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी गणिताचे चार्ट, संगणक माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत प्रयोग सादर केल़े मुख्याध्यापिका सॉलेहा वडवान यांनी विद्यार्थ्यांंच्या प्रयोगाचे कौतुक केल़े या प्रदर्शनासाठी गणित शिक्षक अमीर होटगी, सना शेख, यांनी पर्शिम घेतल़े