शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

सिंगल बातम्या...

By admin | Published: September 03, 2015 11:05 PM

वीरतपस्वीमध्ये संस्कृत दिन साजरा

वीरतपस्वीमध्ये संस्कृत दिन साजरा
सोलापूर : र्शी बृहन्मठ होटगी संचलित भवानीपेठेतील एसव्हीसीएस हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक महादेव वांगीकर आदी उपस्थित होते. लावण्या नंदाल,र्शद्धा मड्डे,ज्योती ढमढेरे, अक्षय बोने, रितू लोहार, श्वेता कल्याणी, संस्कृती बंडगर या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील सुभाषीते, गीते, संवाद, कथा, नाटक सादर केले. सूत्रसंचालन व आभार सत्यव्रत आर्य यांनी मानले.
प्रयोगशाळा कर्मचार्‍यांची समस्या सुटणार
सोलापूर : राज्यातील 15 हजार प्रयोगशाळा कर्मचार्‍यांचा तृतीय वर्गाच्या र्शेणीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष आ. अनिल बोंडे यांनी दिले. अमरावती येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोंडे यांनी हे आश्वासन दिल्याचे जिल्हा संघटनेचे सचिव भीमगोंडा बिराजदार, सहसचिव शशीधर गिरी, संघटक चोपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. प्रयोगशाळा कर्मचार्‍यांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रयत्न झाला. पण हे पद स्वतंत्र संवर्गाचे असताना चतुर्थ संवर्गात गणना होते.
लोधी समाजातील तरुणावरील हल्ल्याचा निषेध
सोलापूर : दोन गटात झालेल्या भांडणास जातीय दंगलीचे स्वरूप देऊन शहर पोलिसांनी रुबाब दाखविण्यासाठी लोधी समाजातील तरुणांवर लाठीहल्ला करून मानवी हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या लाठीहल्ल्याचा डॉ. आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनचे उत्तम नवघिरे यांनी निषेध केला आहे. परिस्थिती हाताळताना पोलिसांनी सीआरपीसी 129 मधील तरतुदीचा भंग केला असल्याचे पत्रक जिल्हा संघटक सागर वाघमारे, शहर अध्यक्ष शेखर बंगाळे, संतोष गजभार, दीपक गवळी यांनी काढले आहे.
सोशल महाविद्यालयात 62 जणांचे रक्तदान
सोलापूर : सोलापूर सोशल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र योजनेच्या 62 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल, उपप्राचार्य डॉ. एफ. एम. सय्यद, डॉ. गौस शेख, डॉ. र्शीकांत येळेगावकर, सलीम शेख, डॉ. इ. जा. तांबोळी उपस्थित होते. लायन्स क्लब सोलापूर सेंटरचे गौतम ओसवाल, राजू चौधरी, आसीम बांगी, सचिन राजगुरू,चंद्रकांत रच्चा, अँड. र्शीनिवास कटकूर, आझम शेख, विठ्ठल सारंगी, रमणलाल सोनमिंडे यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.