शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शाळेच्या आवारात आढळला नाग

By admin | Published: September 01, 2015 9:38 PM

(फोटो)

(फोटो)
वर्गखोलीत आढळला नाग
सर्पमित्रांनी दिले जीवदान : भिवापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार
भिवापूर : मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. विद्यार्थी वर्गखोलीत बसल्यानंतर शिक्षकाने त्यांना शिकवायला सुरुवात केली. काही वेळात खोलीत अनोळखी आवाज यायला सुरुवात झाली. बघतात तर काय, शिक्षकाच्या शेजारी असलेल्या टेबलच्या खाली भला मोठा नाग गुंडाळी घालून बसला होता. शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित खोलीबाहेर काढून सर्पमित्राच्या मदतीने त्या नागाला पकडले. हा प्रसंग अनुभवला भिवापूर येथील दिघोरा भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकाने!
मुख्याध्यापक रामराव टोंग हे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवित होते. अचानक सापाचा फुत्कार सर्वांनाच ऐकायला आला. तपासणी केली असता, टोंग यांच्या शेजारी असलेल्या टेबलखाली नाग गुंडाळी घालून बसला असल्याचे सर्वांच्यास निदर्शनास आले. नागाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराहट निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यातच टोंग यांनी समयसूचकता बाळगत सर्व विद्यार्थ्यांनाा आधी सुरक्षित खोलीबाहेर काढले.
तोवर परिसरातील नागरिकही शाळेत पोहोचले. त्यांनी सापाला मारण्याचा विचार व्यक्त केला. शिक्षकांनी लगेच या नागाची माहिती सर्पमित्र प्रकाश मांढरे याला दिली. प्रकाशने शाळा गाठून त्या नागाला मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या मानातील सापाविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी विस्तृत माहिती दिली. सापापासून स्वत:चा बचाव करण्याचे उपायदेखील सांगितले.
माहिती मिळताच खंडविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र वराडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. कविता मोरे आदी मंडळी शाळेच्या आवारात दाखल झाली होती. त्यानंतर या नागाला वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
---कोट---
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. या काळात सापांचा मुक्तसंचार असतो. दिघोरा येथील शाळेत नाग आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. मुख्याध्यापक टोंग व सर्पमित्र प्रकाश मांढरे यांच्या समयसूचकतेमूळे अप्रिय घटना घडली नाही. शिवाय, त्या नागाला जीवनदान मिळाले. असा प्रकार तालुक्यातील इतर शाळांमध्ये होऊ नये यासाठी सर्व शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सर्पमित्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक कळविले आहेत.
- मनोहर बारापात्रे
खंडविकास अधिकारी, भिवापूर
***