सेंट झेविअर्सच्या विद्यार्थ्यांचे सुयश
By admin | Published: February 01, 2016 12:03 AM
नागपूर : जिंदल विद्या मंदिर आणि रमण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित सायन्स मॉडेलमेकिंग कॉम्पिटीशनमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल हिंगणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून सुयश मिळविले. वेस्ट मॅनेजमेंंट या संकल्पनेवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेतील स्तुती चक्रबर्ती, हर्षिता डालवे, सिमरन सिंग, सिग्धा सिंग यांनी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख ६ हजाराचे पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून डॉ. एस. एम. खेनेड, नेहरू सायन्स सेंटर मुंबई यांनी काम पाहिले. शाळेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, प्राचार्य पल्लवी दाढे, प्रशासकीय अधिकारी निश्चित विजयन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षक फॅबिअन फ्रँक, रितु गुप्ता, सोनाली शेंडे, गौतम गायेन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
नागपूर : जिंदल विद्या मंदिर आणि रमण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित सायन्स मॉडेलमेकिंग कॉम्पिटीशनमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल हिंगणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून सुयश मिळविले. वेस्ट मॅनेजमेंंट या संकल्पनेवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळेतील स्तुती चक्रबर्ती, हर्षिता डालवे, सिमरन सिंग, सिग्धा सिंग यांनी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख ६ हजाराचे पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून डॉ. एस. एम. खेनेड, नेहरू सायन्स सेंटर मुंबई यांनी काम पाहिले. शाळेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, प्राचार्य पल्लवी दाढे, प्रशासकीय अधिकारी निश्चित विजयन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षक फॅबिअन फ्रँक, रितु गुप्ता, सोनाली शेंडे, गौतम गायेन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.हिलफोर्ट पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिननागपूर : हिलफोर्ट पब्लिक स्कूलच्यावतीने आजी-आजोबा दिवस शाळेच्या परिसरात साजरा करण्यात आला. यात शाळेतील मुलांच्या आजी-आजोबांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या संचालक डॉ. परिणिता फुके यांनी सर्व आजी-आजोबांचे स्वागत करून त्यांच्या नातवांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व आजी-आजोबांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून शाळेच्या आयोजनाबद्दल आभार मानले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. आयोजनाबद्दल शाळेचे प्रशासक अजय अग्रवाल, प्राचार्य प्रीती वैरागडे यांनी शाळेच्या चमूचे अभिनंदन केले.