विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ थांबेना
By admin | Published: April 25, 2015 2:10 AM
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ थांबेना
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ थांबेनापॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये गुणांचा घोळ : आयडॉलचे विद्यार्थी संभ्रमातमुंबई :हॉल तिकीटातील चुका, एकाच दिवशी दोन पेपर, विद्यार्थ्यांना दिलेला पेपर काढून घेणे अशा प्रकारानंतर परीक्षेतील गोंधळ थांबेल अशी आपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी ही आपेक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने फोल ठरविली आहे. शुक्रवारी एमए पार्ट वनच्या पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये गुणांचा घोळ करुन विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने संभ्रमात टाकले.मुंबई विद्यापीठामार्फत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी एमए पार्ट १ चा पॉलिटिकल सायन्सचा पेपर होता. रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट ॲण्ड ग्रेड पद्धत लागू असल्याने त्यांना ८0 गुणांचा पेपर होता. तर आयडॉलमधून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची १00 गुणांची परीक्षा होती. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही चार प्रश्न सोडविणे अनिवार्य होते. आयडॉलच्या विद्यार्थ्यांना २५ ऐवजी २० गुणांचा एक प्रश्न देण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले होते. विद्यार्थ्यांनी ही चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चार प्रश्नच अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. याबाबत आपल्याकडे कोणतीच तक्रार आली नसल्याचे परीक्षा नियत्रंक दिनेश भोंडे यांनी सांगितले.