विद्यापीठापुढे अडचणींचा डोंगर उमवि : उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक मिळेना
By admin | Published: December 03, 2015 12:36 AM
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्रांत परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. मात्र, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांची उपस्थिती अत्यंत कमी असल्यामुळे उत्तरपत्रिका तपाण्यासाठी विद्यापीठापुढे पेच निर्माण झाला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर याकालावधित पदवी अभ्यासक्रमाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या परीक्षा झाल्या आहे. ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्रांत परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. मात्र, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांची उपस्थिती अत्यंत कमी असल्यामुळे उत्तरपत्रिका तपाण्यासाठी विद्यापीठापुढे पेच निर्माण झाला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर याकालावधित पदवी अभ्यासक्रमाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या परीक्षा झाल्या आहे. त्यानुसार विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. सूचना देऊनही अल्प उपस्थिती विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर ३० ते ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच दोन वर्ष अध्यापनाचा अनुभव असलेल्या प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवावे, असे सूचित करण्यात आले होते. मात्र, संलग्नित महाविद्यालयांतून अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्वरित पाठवावे, असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. ध. ना. गुजराथी यांनी केले आहे. प्राध्यापकांना रूजू करू नये उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ज्या प्राध्यापकांना महाविद्यालयातून पाठविले आहे. त्या प्राध्यापकांना विद्यापीठाच्या कार्यमुक्त आदेशाशिवाय महाविद्यालयात रूजू करू नयेत, असे विद्यापीठातर्फे सूचित करण्यात आले आहे. प्रतिसाद कमी प्राध्यापकांचा प्रतिसाद कमी असल्याचे मुख्य कारण म्हणजे काही महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयात परीक्षा सुरळीत पार पाडावी, यासाठी अनुभवी प्राध्यापकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती के ल्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (विद्यापीठाचे संग्रहित छायाचित्र घेणे)