सारांशसाठी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
विशेष मुलांला भरतपूरची सफर
विशेष मुलांला भरतपूरची सफरपुणे: नवक्षितीज संस्थेतर्फे भरतपूर अभयारण्यात विशेष मुलांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तीन दिवसाच्या सहलीत 28 विशेष मुलांनी पोपट,किंगफिशर,नीलकंठ आदी पक्षी निरिक्षणासह हरणे,कोल्हे,नीलगाय अजगर पाहिले.नवक्षितीजच्या प्रमुख डॉ.नीलिमा देसाई, वसुधा देवकर, बाळू वायाळ, झेप संस्थेचे मनोज भागवत,राजाभाऊ पाटणकर यांनी सहलीचे आयोजन केले होते.---------------------------------योगासनाचा विक्रम पुणे: मॉर्डन ,कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हिमांशू सांखे यांनी शनिवारी महाविद्यालयाच्या आवारात सकाळी 8.30 वाजता सर्वांगसन (योगा पोश्चर) या आसनाची सुरूवात करून 1 लास 21 मिनिटे तसेच राहून नवीन विश्व विक्रम नोंदवला.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.या पूर्वी नांदेडच्या युवकाने 1 तास 20 मिनिटाचा विक्रम केला होता.कार्यक्रमास लिम्का बुकच्या अधिकारी अस्मिता मोरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र झुंजारराव,नरेंद्र नायडू, विक्रम फले,दिपक कुटे,विद्या खांगटे,जयंत डोफे, आदी उपस्थित होते.विश्वविक्रम कार्यक्रमाचे संयोजन विवेक खांगटे,नारायण फड यांनी केले होते.--------------------------