उन्हाळी सुीतून शैक्षणिक रसद... स्वावलंबी बालपण : गरीब व होतकरू विद्यार्थी सुीच्या काळात करतात काम; किराणा दुकान, रसवंती, हॉटेल अशा ठिकाणांवर कामाला
By admin | Published: May 11, 2016 10:14 PM
जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सुीच्या काळात किराणा दुकान, रसवंती किंवा हॉटेल अशा ठिकाणी काम करून पैसे जमवतात. त्यातून स्वावलंबनाचे धडे तर हे विद्यार्थी गिरवतात; शिवाय त्यांच्यात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण होते.
जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सुीच्या काळात किराणा दुकान, रसवंती किंवा हॉटेल अशा ठिकाणी काम करून पैसे जमवतात. त्यातून स्वावलंबनाचे धडे तर हे विद्यार्थी गिरवतात; शिवाय त्यांच्यात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण होते.केसीई सोसायटीच्या शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक प्रा.चंद्रकांत भंडारी यांनी, उन्हाळ्याच्या सुीत १० ते १५ या वयोगटातील विद्यार्थी काय करतात? यासाठी सुमारे १ हजार विद्यार्थ्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात सर्वेक्षण केले. त्यात सुमारे ४०० विद्यार्थी हलकी कामे करून आर्थिक मदत उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले. हे विद्यार्थी सुीच्या काळात काम करून जे पैसे कमवतात; त्यातील काही पैशांतून ते आपल्या पुढील शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, कपडे घेतात. तर उरलेले पैसे आई-वडिलांकडे देतात.सुी सार्थकी...एका शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना दोन दीर्घ सुट्या असतात. त्यात हिवाळी व उन्हाळी या सुट्यांचा समावेश असतो. हिवाळी म्हणजे दिवाळीची सुी सर्वसाधारण ३ आठवड्यांची असते. तर उन्हाळी सुी ही २ महिन्यांची असते. हिवाळ्यात तसे कॅम्प, शिबिरे कमी असतात. तर उन्हाळ्यात त्यांचे प्रमाण खूप असते. आर्थिक परिस्थिती चांगली असणारे पालक आपल्या पाल्यांना या शिबिरांमध्ये दाखल करतात. परंतु बेताची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. ते सुीत काम करून पैसे कमवतात.सर्वेक्षण दृष्टिक्षेपात-एकूण १ हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.-३७५ विद्यार्थी विविध कॅम्प, शिबिरांमध्ये जातात.-२०० विद्यार्थी नातेवाईकांच्या गावाला जातात.-४०० विद्यार्थी विविध कामांना जाऊन पैसे कमवतात.-२५ विद्यार्थी काहीच करीत नाहीत.महिन्याची कमाई २ ते ३ हजारकामाला जाणार्या ४०० विद्यार्थी (जे ७ वी ते १० वीचे शिक्षण घेतात) २ ते ३ हजार रुपये महिना कमवतात. त्यातील निम्मे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षाच्या खर्चाची तरतूद करतात. अनेक विद्यार्थ्यांचे प्रयत्न पाहून त्यांना त्यांचा मालकही मदत करत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. उदाहरणार्थ : २ हजार रुपये कमवत असतील तर काही विद्यार्थी १ हजार ते १२०० रुपये घरी देतात.