राज्य पुरस्कारासाठी शिक्षकांची मांदियाळी जाहीर
By admin | Published: September 05, 2015 12:36 AM
शासनाच्या वतीने 2015 वर्षासाठी राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची मांदियाळी जाहीर झाली आहे.
शासनाच्या वतीने 2015 वर्षासाठी राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची मांदियाळी जाहीर झाली आहे.पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांची नामावली पुढीलप्रमाणे- प्राथमिक विभाग- 1) फ्लाविया डिसौझा, सरकारी प्राथमिका विद्यालय, म्हापसा बार्देश, 2) सुलभा गावकार- सरकारी प्राथमिक शाळा बेथमुड्डी, काकोडे.माध्यमिक विभाग- 3) अरुण महादेव पाटील- सहाय्यक शिक्षक - हुतात्मा बापू गावस मेमोरियल सरकारी विद्यालय, चांदेल पेडणे. 4) कोलेट फ्रांसिस्का झेवियर- सहायक शिक्षक, पोप जॉन हायस्कूल, केपे. मुख्याध्यापक गट- 5) शोभा म्हाडगुत- मुख्याध्यापिका- प्रोग्रेस हायस्कूल, पणजी. 6) स्नेहल संझगिरी- मुख्याध्यापिका, दीपविहार हायस्कूल हेडलँड,सडा वास्को. उच्चामाध्यमिक विभाग - 7) नवनाथ बी सावंत- प्रथम र्शेणी शिक्षक - र्शीमती सी. टी. नायक उच्च माध्यमिक विद्यालय, कुडचडे. प्राध्यापक विभाग- 8) अनिल सामंत, प्राध्यापक, पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय, खोर्ली म्हापसा. फ्लाविया डिसौझा यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान असून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्याकरणाचे पुस्तकही लिहिले आहे. सुलभा गावकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक विकासासोबत गावातील प्रौढ शिक्षणावर भर दिला आहे. विश्वशांति आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र सुवर्ण गौरव पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिभा रत्न गौरव, ग्लोबल इंडिया नॅशनल अँवॉर्ड यासारख्या अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.अरुण पाटील यांनी मुलांच्यामध्ये शैक्षणिक आवडी सोबतच लोककलाविषयीची आवड विद्यार्थ्यांच्यामध्ये केल्याने ते लोकप्रीय शिक्षक ठरले आहेत. कोलेट झेवियर यांनी गरीब तथा होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. शोभा म्हाडगुत यानी मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक विषयांतील प्रगतीवर भर दिलेली आहे. नवनाथ सावंत यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये तथा पालकांच्यामध्ये केलेल्या आरोग्यविषयक जागृतिची दखल शासनाने घेतली आहे. अनिल सामंत यांचे गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यानी अविरत पर्शिम घेतले आहेत.