रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सुचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रम
By admin | Published: April 24, 2016 12:39 AM
रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
रेखा गॅस एजन्सीतर्फे समय सूचक सेफ्टी क्लिनीक कार्यक्रमांतर्गत हुडको पिंप्राळा येथील लग्न सभागृहात उपस्थित महिलांना गॅस गळती व सिलिंडर तपासणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. वाहनांमध्ये अवैध गॅस सिलिंडरचा वापर व त्यामुळे गॅसचा स्फोट व होणारी जीवित हानी तसेच घरगुती गॅस गळतीच्या वेळी घ्यावयाची काळजी याबाबत रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी मार्गदर्शन केले. तर व्यवस्थापिका संगीता जोशी यांनी महिलांना गॅसची बचत करण्यासंबंधी व अचानक गळती झाल्यास आपत्कालीन नंबरचा वापराबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्योत्सना भारंबे यांनी घेतलेल्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात बरोबर उत्तर देणार्या महिलांना बक्षीस देण्यात आले. यशस्वीतेसाठी मेहमूद पटेल व भैया पटेल यांनी परिश्रम घेतले.