आजपासून दहावीची परीक्षा नशिराबाद केद्रात ५६१ विद्यार्थी
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM
जळगाव- दहावीच्या परीक्षेस आज १ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी नशिराबाद न्यू इंग्लीश स्कूल केंद्र (केंद्र क्र.३०३५) असून ५६१ विद्यार्थी परीक्षार्थी आहे. त्यात मराठी माध्यमाचे ४३६ तर उर्दू माध्यमाचे १२५ जणांचा समावेश आहे. मुख्याध्यापक एम.डी.तायडे केंद्र संचालक आहे. खोली क्र.१ ते १७ मुख्य इमारतीत असून १८ ते २३ खोली क्रमांकाची बैठक व्यवस्था वीर सावरकर सभागृहाच्यावरील खोल्यांमध्ये आहे. त्यात डी-१५४२११ ते डी-१५४३४३ पर्यंतच्या क्रमांकाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
जळगाव- दहावीच्या परीक्षेस आज १ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी नशिराबाद न्यू इंग्लीश स्कूल केंद्र (केंद्र क्र.३०३५) असून ५६१ विद्यार्थी परीक्षार्थी आहे. त्यात मराठी माध्यमाचे ४३६ तर उर्दू माध्यमाचे १२५ जणांचा समावेश आहे. मुख्याध्यापक एम.डी.तायडे केंद्र संचालक आहे. खोली क्र.१ ते १७ मुख्य इमारतीत असून १८ ते २३ खोली क्रमांकाची बैठक व्यवस्था वीर सावरकर सभागृहाच्यावरील खोल्यांमध्ये आहे. त्यात डी-१५४२११ ते डी-१५४३४३ पर्यंतच्या क्रमांकाची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.-----जळगाव सीए शाखेतर्फे चर्चासत्रजळगाव- जळगाव सी.ए. शाखा तसेच जळगाव जिल्हा टॅक्स प्रॅक्टीशन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय.सी.ए.आय. भवन, गजानन कॉलनी,रिंगरोड येे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान बजेट -२०१६ वर चर्चासत्र झाले.जळगावचे वरिष्ठ सी.ए.सदस्य सी.ए.अनिलकुमार शाह व सी.ए. एस.आर.मणियार हे तज्ज्ञ अर्थसंकल्पातील बारकावे सदस्यांना समजावण्याकरीता उपस्थित होते. त्यांच्यामते आजचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे कृषीप्रधान असा होता. त्यात शेतकर्यांना विशेष असे महत्व देऊन त्यांच्या पुरेपुर मदतीसाठी विमा योजना तसेच खताच्या सबसीडीचे रक्कम सरळ बँक खात्यात जमा करण्यासाठी बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. म्हणजेच एकंदरीत हा संकल्प सरासरी राहिला,असे मत उपस्थित सदस्यांनी मांडले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन जळगाव सी.ए.शाखेेचे सचिव अजय जैन यांनी केेले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव सी.ए.शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, उपाध्यक्ष पल्लवी मयूर तसेच सी.ए. कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन- चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अनिलकुमार शाह. डावीकडे साहेबराव पाटील, उजवीकडून जळगाव शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, एस.आर.मणियार व अजय जैन.