मस्ट बातमी -
By admin | Published: April 25, 2016 12:27 AM
अंकात ठळकपणे वापरावी.
अंकात ठळकपणे वापरावी.------------------------विधि विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाला‘दी प्रॅक्टीकल लॉयर’मध्ये स्थानमुंबई : प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे दोन युवा विद्यार्थी शादरूल कुलकर्णी (द्वितीय वर्ष) व आदित्य मनुबरवाला (तृतीय वर्ष) यांचा शोधनिबंध ‘दी प्रॅक्टीकल लॉयर, सुप्रीम कोर्ट केसेस पब्लिकेशन’ने आपल्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केला आहे. विधि क्षेत्रात या प्रकाशनाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते; एवढेच नव्हे तर, यातील प्रकाशित साहित्याचे दाखले सर्वोच्च न्यायालयातही मानले जातात. विशेष म्हणजे, या दोघा विद्यार्थ्यांचे विधि व न्यायविषयक काही लेख यापूर्वीच ‘लोकमत टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.कुष्ठपिडीतांसंबंधीच्या विविध कायद्यांचे विधी आयोगाच्या 256व्या अहवालाच्या अनुषंगाने परीक्षण करून आदित्य मनुबरवाला व शादरूल कुलकर्णी यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. ब्रिटिश काळापासून वर्ष 2016पर्यंतच्या विविध कायद्यांचा तौलनिक अभ्यास या शोधनिबंधात आहे. स्पष्ट भेदभाव करणार्या तीन वैधानिक तरतुदी रद्द करण्याबाबतची शिफारस विधि आयोगाने आपल्या अहवालात केलेली नाही, यावरही या विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे टीका केली आहे.शिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळ याबाबतच्या कायद्यामध्येही कुष्ठपिडीतांना सापत्न वागणूक आहे. ते कायदे बदलणे तर दूरच, त्यांचा साधा उल्लेखही आयोगाच्या अहवालात नसल्याचे शादरूल व आदित्य यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.------------24शोधनिबंध