खरे पालक शिक्षकच चंद्रकांत घोडके : गुरुविद्या प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
By admin | Published: September 08, 2015 2:08 AM
सोलापूर : वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना पालक सांभाळतात़ त्यानंतर खर्या अर्थाने सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवरच पडत़े संस्कारांचीही बरीच जबाबदारी त्यांच्यावर येत़े त्यामुळे खरे पालक हे शिक्षकच ठरतात, असे प्रतिपादन भू-विकास बँके चे माजी चेअरमन चंद्रकांत घोडके यांनी केल़े
सोलापूर : वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना पालक सांभाळतात़ त्यानंतर खर्या अर्थाने सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवरच पडत़े संस्कारांचीही बरीच जबाबदारी त्यांच्यावर येत़े त्यामुळे खरे पालक हे शिक्षकच ठरतात, असे प्रतिपादन भू-विकास बँके चे माजी चेअरमन चंद्रकांत घोडके यांनी केल़े गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होत़े सोमवारी सायंकाळी समाजकल्याण सांस्कृतिक कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास उद्योजक मोहन भूमकर, बंडा प्रशालेचे शिक्षक शिवाजी व्हनकडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशंकर भोगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा़ प्रभाकर नागणसुरे यांनी भूषविल़े प्रास्ताविक सोमशंकर भोगडे यांनी केल़े दीपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशंकर भोगडे यांनी केल़े प्रमुख अतिथी म्हणून बोलताना चंद्रकांत घोडके म्हणाले की, शिक्षक हा विद्यार्थीच असतो़ विद्यादान हे सर्वर्शेष्ठ दान आह़े चांगली पिढी घडविण्याचे मोठे काम शिक्षकांना करावे लागत आह़े यानंतर प्रा़ नागणसुरे यांनी मनोगतातून प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी धडपडत असल्याचे सांगितल़े विद्यार्थ्यांचा स्तर उंचावेल, असे शिक्षण देण्याचे महान कार्य शिक्षक करीत असल्याचेही ते म्हणाल़े शिवाजी व्हनकडे यांनी आपल्या मनोगतातून ‘आई जन्म देते, गुरू जीव देतो, कसे वागावे हे समाज शिकवते’ अशी व्याख्या केली़ सूत्रसंचालन र्शीदेवी येळमेली यांनी केले तर आभार आनंद लिगाडे यांनी मानल़े यावेळी प्रतिष्ठानच्या संघटक अल्का मलगोंडे आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत़े (प्रतिनिधी)सत्कारमूर्तींचा झाला गौरव * आदर्श शिक्षक - शरणबसवेश्वर वांगी (सोनी महाविद्यालय), रोहिणी सुरा (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल), मंगल मुत्तूर (करंजकर विद्यालय), निर्मला भूषण (राजमल बोमड्याल प्राथमिक शाळा), भाग्यर्शी चव्हाण (ऑर्किड स्कूल), पुष्पा इनामदार (ग़ सा़ पवार प्राथमिक शाळा), मीना पारखे (सेंट जोसेफ)* आदर्श माता पुरस्कार - मीनाक्षी पांडुरंग शिंदे * राष्ट्रीय खेळाडू सन्मान - मुजम्मिल मंगलगिरी -------------------------------------फोटो - गुरुविद्या प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण भू-विकास बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत घोडके यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी शिवाजी व्हनकडे, मोहन भूमकर, अल्का मलगोंडे, आनंद लिगाड़े