मोडी लिपीच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न
By admin | Published: August 18, 2015 9:37 PM
पुणे : विस्मृतीच्या गर्तेत जात असणार्या मोडी लिपीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड यांच्या वतीने गेली सलग ५ वर्षे प्रयत्न केले जात आहेत. वाचता येत नाही म्हणून अडगळीत पडलेली मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे वाचली जाऊन त्यातून इतिहासावर प्रकाश पडावा यासाठी महाविद्यालय अभ्यास वर्ग घेत आहे.
पुणे : विस्मृतीच्या गर्तेत जात असणार्या मोडी लिपीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड यांच्या वतीने गेली सलग ५ वर्षे प्रयत्न केले जात आहेत. वाचता येत नाही म्हणून अडगळीत पडलेली मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे वाचली जाऊन त्यातून इतिहासावर प्रकाश पडावा यासाठी महाविद्यालय अभ्यास वर्ग घेत आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात व इतिहास विभागाच्या प्रमुख श्रुती भातखंडे यांनी ही माहिती दिली. मोडी लिपी ही मध्ययुगीन भारताची अत्यंत महत्वाची लिपी होती. बहुसंख्य राजकीय तसेच सामाजिक व्यवहारही याच लिपीतून होत असे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रे याच लिपीतून लिहीलेली आहे. त्यात शिवकालीन, पेशवेकालीन कागदपत्रांचा समावेश आहे. कालांतराने या लिपीचे महत्व कमी झाले. आता तर मोजक्याच काहीजणांना ती येते. त्यामुळे असंख्य ऐतिहासिक कागदपत्रे वाचल्याविनाच पडून आहेत. ती वाचली जावी यासाठी महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.मोडी लिपीच्या अभ्यासकांकडून यात त्या लिपीचे वाचन व लेखन शिकवले जाते. मागील ५ वर्षांपासून असा वर्ग घेतला जातो व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळचा वर्ग शनिवार, २२ ऑगस्ट ते रविवार १३ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवार व रविवार दुपारी १२ ते २ या वेळात महाविद्यालयात (गणेश खिंड, पुणे ४११०१६) होणार आहे. सहभागासाठी वयाची अट नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने मोडी लिपीतील बाराखडीचे पुस्तक देण्यात येते तसेच वर्गाच्या अखेरीस प्रमाणपत्रही मिळते. प्रवेश शुल्क आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)