अनेक मुलं तासनतास फेसबुक, व्हॉट्सअॅपवर पडीक असतात. काहीजण तर युटय़ूबवर तमामा व्हीडीओ पाहतात. अनेकजण तर आता अभ्यासपण ऑनलाइनच करतात. नोट्स ऑनलाइन काढतात. वाचतात. आणि आपल्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पण पाठवतात. मात्र हेच सारं वापरुन त्याचा आपल्या व्यावसायिक गरजेसाठी आणि उत्तम जॉब ‘ब्रेक’मिळवण्यासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो हे अनेकांना कळत नाही. हा जमानाच नेटवर्किगचा आहे. तुम्हाला ते जमलं तर अनेक संधी स्वतर्हून तुमच्याकडे येतील, अनेक लोक तुमचं नाव योग्य त्या कामासाठी निवडतील. मात्र त्याची पायाभरणी आपण कॉलेजच्या दिवसांपासूनच करायला हवी. त्यासाठीच या काही टीप्स.
1) लिंकएडीन
फेसबुकपेक्षा जरा किचकट हे प्रकरण. मात्र जास्त कामाचं. लिंकएडीनवर जाऊन तुमचं प्रोफाईल बनवा. पूर्णत. व्यावसायिक जाऊन तुमचं प्रोफाईल बनवा. पुर्णता व्यावसायिक. त्यात तुमचे स्किल्स ठळकपणे मांडा. तुम्हाला काय येतं, काम करायची इच्छा काय आहे, तुमच्या आयडिया काय आहेत हे नीट लिहा. अघळपघळ, बाष्कळ नाही तर प्रोफेशनली प्रेझेण्ट करा स्वतर्ला. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क करा. गांभीर्याने नेटवर्किग केलं तर तुमच्या ओळखी वाढून तुम्हाला काही संधी मिळू शकतात.
2) फेसबुक
टाइमपास करणं असा विचार न करता, तिथं आपलं चांगलं काम, आवड, आपले स्किल्स याविषयी पोस्ट करा. तुमच्या क्षेत्रात नवनव्या ओळखी करुन घ्या. गळेपडूपणा न करता आणि कुणाला त्रास न देता, आपलं संपर्क वतरुळ वापरा. लोचटपणा करण्याचा धोका टाळा. तिथं उत्तम लेख पोस्ट होतात, काही उत्तम चर्चा असतात. त्या वाचा. विषय अधिक खोलात जाऊन समजून घ्या. चार चांगल्या ओळखी झाल्या तर त्यांचा मान ठेवून चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
3) व्हॉट्स अॅप
ते असतंच हल्ली तुमच्या फोनवर. ग्रुप्सवर चर्चा, चेष्टा, फॉरवर्ड खेळण्यापेक्षा काही असे ग्रुप्स करा की, जिथं आपले सारे मित्र जे जे उत्तम वाचलं, पाहिलं ते शेअर करतील. ते वाचून विषय समजेल. अधिक तपशिल कळेल. जगाचं भान येईल. आपण काही लिहिलं तर ते व्हॉट्सअॅपवर शेअर करा. लोकांना वाचायला पाठवा. सेल्फ ब्रॅण्डींग वाईट नाही, पण अतिरेक टाळून स्वतर्ला प्रमोट करणं जमलं पाहिजे.