स्वच्छता हा संस्कार म्हणून स्वीकारावा कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील : उमवित क्लीन कॅम्पस उपक्रम
By admin | Published: November 05, 2016 12:13 AM
जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अभियानातंर्गत राबविल्या जाणाज्या स्वच्छता पंधरवड्याच्या (क्लीन कॅम्पस) उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले. सुरुवातीला प्रा. संजय पत्की, अलका चव्हाण, तेजस मराठे, गोपाळ ठाकरे, धनंजय देशमुख, अजिंक्य इनामदार यांनी राम का गुणगान, संत मिराबाई यांच्या मिरा हो गयी मगन या भजनाने केली. स्वच्छता अभियानाची शपथ कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी दिली. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचे सर्व सॅटेलाईट सेंटर ( अमळनेर, धुळे, नंदूरबार) येथे परिसर स्वच्छता कार्यक्रम होतील. ११ रोजी सागर पार्क ते जी.एस.ग्राऊंड परिसर स्वच्छता , १२ रोजी प्रशासकीय इमारत, अधिसभा सभागृह, पदवीप्रदान सभागृह, पाणी पुरवठा इमारत आणि पाळधी गाव व परिसर, १३ रोजी मुले व मुलींचे वसतिगृह, १५ रोजी परिसर स्वच्छता व श्रमदानाने या पंधरवड्याचा समारोप होईल. प्रास्ताविक उपकुलसचिव डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण यांनी केले.कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन, बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कर्हाड, परीक्षा नियंत्रक डी.एन.गुजराथी, प्रा.सत्येंद्र मिश्रा, प्रा.जे.बी.नाईक आदी उपस्थित होते. सागरमित्र अभियानाचे विशाल सोनकुळ यांनी देशातील व परदेशातील विविध शाळांमध्ये स्वच्छतेसंदर्भात राबविण्यात येणार्या चळवळींविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक सत्यजित साळवे यांनी केले.