नाशिक : नाएसोच्या सीडीओ मेरी हायस्कूलमधील तांत्रिक विभागात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला विविध उपयुक्त साहित्य व शस्त्र यांची पूजा करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पूजा गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी व महिंद्रा कंपनीचे उपव्यवस्थापक रुपाल देवधर, संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, उपमुख्याध्यापक राजश्री वैशंपायन, पर्यवेक्षक मधुकर पगारे, कृष्णा राऊत, मुग्धा काळकर आदि उपस्थित होते. भविष्यात प्रभावी, कुशल अभियंता बनण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी नवनवीन ज्ञान मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन देवधर यांनी केले. प्रास्ताविक ज्योती कुलकर्णी यांनी केले.फोटो ओळी--- नाएसोच्या मेरी शाळेत तांत्रिक विभागात शस्त्रपूजन करताना रु पाल देवधर, पूजा गायकवाड, दिलीप अहिरे, मधुकर पगारे, काळकर आदि.फोटो - आरला १० शस्त्रपूजा नावाने फोटो सेव्ह
मेरी तांत्रिक विभागात शस्त्रपूजन
By admin | Published: October 11, 2016 12:01 AM